Join us
Daily Top 2Weekly Top 5

निक्की मिनाजने एक्स-बॉयफ्रेन्डने केला गंभीर आरोप! ट्विटरवर काढली भडास!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 19:32 IST

होय, अलीकडे ‘क्वीन’ हा अल्मब लॉन्च करणाऱ्या निक्कीवर तिचा बॉयफ्रेन्ड व रॅपर सफारी सम्युअलने गंभीर आरोप केला आहे.

आपल्या शानदार गाण्यांनी आणि रॅपने कोट्यवधी चाहत्यांची मने जिंकणारी अमेरिकन रॅपर निक्की मिनाज सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. होय, अलीकडे ‘क्वीन’ हा अल्मब लॉन्च करणाऱ्या निक्कीवर तिचा एक्स-बॉयफ्रेन्ड व रॅपर सफारी सम्युअलने गंभीर आरोप केला आहे. निक्कीने आपल्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचे त्याने म्हटले आहे. निक्की मिनाज व रॅपर सफारी दोघेही दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये होते. पण एकवेळ अशी आली की, त्यांच्यातील वाद प्रचंड विकोपाला गेलेत.

सफारी सॅम्युअलने ट्विटरवर थेट आरोप केलेत. निक्कीला उद्देशून त्याने हे आरोप केले आहेत. ‘मला ती रात्र आठवतेय, ज्या रात्री तू माझ्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. मी मरणासन्न अवस्थेत पडलो होतो. पोलिस आलेत आणि मला रूग्णालयात घेऊन गेलेत. तेथे माझ्यावर उपचार झालेत. मी आत्महत्येचा प्रयत्न केला, असे मी पोलिसांना खोटे सांगितले. जेणेकरून तुला तुरूंगात जावे लागू नये,’ असे ट्विट सफारीने केले आहे.

 विशेष म्हणजे, सफारीच्या या आरोपाला निक्कीनेही उत्तर दिले आहे. ‘तू माझे क्रेडिट कार्ड चोरले. तुझ्यासाठी मी केवळ एक बँक अकाऊंट होते. देव, तुला तुझ्या कर्माची आणि मी खोटे बोलत असेल तर माझ्या खोटेपणाची शिक्षा जरूर देईल,’असे तिने लिहिले आहे.

 

 

टॅग्स :हॉलिवूड