Join us
Daily Top 2Weekly Top 5

संगीतच जगण्याचा आधार : टॉम जोन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2016 20:20 IST

या वर्षाच्या सुरुवातीलाच पत्नी लिंडा हिचे निधन झाल्याने अतिशय दु:खी झालेल्या गायक टॉम जोन्सचे म्हणणे आहे की, पत्नीच्या मृत्यूनंतर ...

या वर्षाच्या सुरुवातीलाच पत्नी लिंडा हिचे निधन झाल्याने अतिशय दु:खी झालेल्या गायक टॉम जोन्सचे म्हणणे आहे की, पत्नीच्या मृत्यूनंतर संगीतच जगण्याचा आधार बनले असून, त्याच्यामुळेच मी जीवंत आहे. एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार जोन्स हे ‘द वॉइस’ या रिअ‍ॅलिटी शोच्या मंचावरून आपल्या भावना व्यक्त केल्या. या शोमध्ये त्यांचे परतणे अनेकांना सुखद धक्का देणारे ठरले आहे, तर जोन्सच्या मते मी जेवढा वेळ या मंचावर किंवा संगीताच्या सानिध्यात राहील तेवढा वेळ माझे जगणे सुसह्य होणार आहे. जोन्सने एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मी या शोमध्ये परतलो आहे. हा माझ्यासाठी खूप मोठा निर्णय होता. मात्र आता मला याची जाणीव होत आहे की, संगीतच माझ्या जीवनाचा खूप मोठा आधार आहे. कारण पत्नीच्या निधनानंतर माझी जगण्याची इच्छा संपली होती. त्यामुळे पुन्हा मी गाणार की नाही, याबाबत मला साशंकता होती, परंतु या शोमुळे मला जगण्यात काहीसा आधार मिळाला आहे. मला असे वाटते की, जेवढा वेळ मी स्वत:ला व्यस्त ठेवणार तेवढा वेळ मला जगण्यास मदत करेल. आता संगीताच्या आधारे पुढील जीवन जगायचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.