Join us

  पॉप सिंगरच्या मिनी पर्सने वेधले सगळ्यांचे लक्ष, पाहून तुम्हीही व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 15:06 IST

लिजो तिच्या बिनधास्त स्टाईलसाठी ओळखली जाते. रविवारच्या इव्हेंटमध्येही ती अशाच बिनधास्त स्टाईलमध्ये पोहोचली. पण तिच्या लूकपेक्षा तिच्या हातातील पर्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

ठळक मुद्देलिजोचे खरे नाव मेलिसा जेफर्सन आहे.

रविवारी झालेल्या अमेरिकन म्युझिक अवार्ड्स 2019मध्ये पॉप सिंगर व रॅपर लिजोने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. लिजो तिच्या बिनधास्त स्टाईलसाठी ओळखली जाते. रविवारच्या इव्हेंटमध्येही ती अशाच बिनधास्त स्टाईलमध्ये पोहोचली. पण तिच्या लूकपेक्षा तिच्या हातातील पर्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. होय, लिजोने हातात एक क्यूट पर्स कॅरी केली होती. पण या पर्सचा साईज बघून सगळेच हैराण झालेत.

 लिजोने सोशल मीडियावर इव्हेंटमधील पर्ससोबतचा फोटो शेअर केला. तिच्या या फोटोने लक्ष वेधलेच. पण या फोटोला तिने दिलेले कॅप्शनही लक्षवेधी ठरले. ‘माझ्या पर्सचा आकार तेवढाच आहे, जितका लोकांच्या बोलण्याने मला फरक पडतो,’ असे तिने लिहिले.

याचा अर्थ एकच लोक काही बोलोत लिजोला जराही फरक पडत नाही. या पर्समध्ये काय आहे, असा प्रश्न तिला केला गेला. यावर या पर्समध्ये टेम्पोन, टकीलाची बाटली आणि कंडोम असल्याचे मजेशीर उत्तर तिने दिले.

लिजोचे खरे नाव मेलिसा जेफर्सन आहे. सिंगर चार्ली एक्ससीएक्ससोबत तिने गायलेले ‘ब्लेम इट आॅन योर लव’, ‘लाईक अ गर्ल’ आणि ‘टेम्पो’ ही गाणी प्रचंड लोकप्रिय झाली होती.

टॅग्स :हॉलिवूड