Join us
Daily Top 2Weekly Top 5

किम कर्दाशियांने ‘या’ खास व्यक्तीसाठी जपून ठेवले तिचे सर्वकाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2017 21:54 IST

नेहमीच चर्चेत राहणारी किम कर्दाशियां हिने नुकतेच तिच्या आयुष्यातील एक सिक्रेट उघड केले आहे. किमने सांगितले की, मुलगी नॉर्थसाठी ...

नेहमीच चर्चेत राहणारी किम कर्दाशियां हिने नुकतेच तिच्या आयुष्यातील एक सिक्रेट उघड केले आहे. किमने सांगितले की, मुलगी नॉर्थसाठी तिने तिचे सर्व कपडे आणि आभूषणे जपून ठेवली आहेत. किमला पती कान्ये वेस्ट याच्यापासून तीन वर्षांची मुलगी नॉर्थ आणि १४ महिन्यांचा सॅँट नावाचा मुलगा आहे. मिरर डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, स्नॅपचॅटच्या व्हिडीओ सिरीजमध्ये किमने हे सिक्रेट उघड केले आहे. व्हिडीओमध्ये किम म्हणतेय की, मी आतापर्यंत जे काही परिधान केले आहे, त्याचा मी संग्रह बनविणार आहे. तुम्हाला आठवतंय काय, मी प्रिन्सच्या कॉन्सर्टमध्ये काय परिधान केले होते? याच गोष्टी प्रत्येकाच्या स्मरणात राहाव्यात म्हणून मी सर्व काही माझ्या मुलीला देणार आहे. या व्हिडीओमध्ये नॉर्थ पुटपुटताना दिसत आहे. किम नॉर्थला म्हणतेय की, तुला माझे शूज आवडतात का? मी हे शूज तुझ्यासाठी जपून ठेवणार आहे. नॉर्थनेही लगेचच होकार देत, होय असे म्हटल्याचे दिसते. किम तिचे सर्व कपडे एका गुप्त जागेत लपवून ठेवत असल्यावरूनही तिला विचारण्यात आले. किमनेदेखील यावर बिनधास्तपणे उत्तरे देत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. त्यामुळे तिच्या फॅन्सला आता या किमच्या कपड्यांविषयीचे कोडे उलगडले, हे निश्चित. यावेळी किम म्हणाली की, माझ्या कपाळावर एक तीळ होता. मी तीन वेळा सर्जरी करून त्याला काढले. आता तो त्वचेच्या रंगासारखा दिसत असल्याने बºयाच लोकांना तो पिंपल असल्याचे वाटतेय. परंतु तो तीळ असल्याचाही खुलासा किमने केला. किमच्या या बिनधास्त खुलाशांमुळे चाहत्यांना तिच्याविषयीच्या बºयाचशा बारीकसारीक गोष्टी कळून चुकल्यात, हे नक्की !