Join us

ऐकावं ते नवलंच, एका रुम इतका मोठा आहे किम कार्देशियनच्या घरातील फ्रिज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 14:32 IST

आतापर्यंत अनेकवेळा आपण सेलिब्रेटींच्या घराची सफर केली आहे पहिल्यांदाच करुया फ्रिजची सफर

किम ही हॉलिवूडमध्ये स्टायलिश अभिनेत्री म्हणूनच ओळखली जाते. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर देखील ती तिचे हॉट आणि सेक्सी फोटो पोस्ट करत असते. त्यामुळे तिला सोशल मीडियावर देखील चांगलेच फॅन फॉलोव्हिंग आहे. किम सध्या तिच्या हॉट किंवा सेक्सी फोटोमुळे चर्चेत नाही तर तिच्या घरातल्या फ्रिजला घेऊन चर्चेत आली आहे. असे गोंधळून जाऊ नका. किमने सोशल मीडियावर तिच्या घरातील मोठा फ्रिज आणि किचनचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.  किमचा हा व्हिडीओ एवढा मोठा आहे की त्या एखादा माणूस सहज जाऊन राहू शकतो.  यात किमने फळं आणि भाज्यांचा साठा केल्याचे व्हिडीओ पाहताना दिसतेय. विशेष म्हणजे किम या व्हिडीओत फ्रिजमध्ये फिरताना दिसतेय. 

जगाभरातील लोकांसाठी किमच्या घरातील फ्रिज कुतूहला विषय ठरला आहे. तिच्या व्हिडीओ चाहत्यांनी कमेंट्सचा भडिमार केला आहे.   किम कार्दिशियनने काही महिन्यांपूर्वी फोटोशूट केलं होतं. या फोटोंनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. या फोटोंमध्ये किमने बिकनीऐवजी फुलांनी स्वतःचं अंग झाकून घेतलं होतं. हा फोटो सोशल मीडियावर बरेच दिवस व्हायरल होताना दिसला होता.

किमने रॅपर आणि फॅशन डिझायनर कान्ये वेस्टसोबत २०१४ मध्ये लग्न केले. याआधी किमची दोन लग्नं झाली होती. किम नेहमीच तिच्या वक्तव्यांसाठी चर्चेत असते.

टॅग्स :किम कार्देशियन