Join us  

'या' सुपरस्टारने एका शब्दासाठी आकारले 75 लाख, त्याची फी सलमान-शाहरुखपेक्षा जास्त, FLOP चित्रपटानेही कमावले होते 1200 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 2:45 PM

 फिल्म इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक मानधन घेणारे अनेक स्टार्स आहेत.

 फिल्म इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक मानधन घेणारे अनेक स्टार्स आहेत. कोणी चित्रपटासाठी 100 कोटी रुपये घेतात, तर कोणी 200 कोटी  घेतात. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा सुपरस्टारबद्दल सांगणार आहोत. जो रुपेरी पडद्यावर फक्त एक शब्द बोलण्यासाठी 75 लाख रुपये घेतो. हे वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटलं ना. पण हे सत्य आहे. अमिताभ बच्चन, सलमान खान की शाहरूख खान कोण आहे तो अभिनेता? हे आपण जाणून घेऊया.

त्या सुपरस्टारचे नाव आहे 'केनू रीव्स'. 'केनू रीव्स' हा हॉलिवूड चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता आहे. 1999 मध्ये रिलीज झालेल्या 'द मॅट्रिक्स' या ॲक्शन थ्रिलर चित्रपटाने कीनू रीव्सला सुपरस्टार बनवलं. या चित्रपटातून त्यानं 500 कोटींची कमाई केली होती. यानंतर त्यानं कधीच मागं वळून पाहिलं नाही. काही वेळातच तो सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता बनला.

रिपोर्ट्सनुसार, केनू रीव्सने 'द मॅट्रिक्स'च्या दोन सिक्वेल चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी निर्मात्यांकडून 100 दशलक्ष डॉलर्स ( 450 कोटी रुपये) घेतले होते. यात कीनू रीव्सने निओची भूमिका साकारली होती. दोन्ही चित्रपटात त्यांनी 638 शब्द बोलले होते. अशाप्रकारे कीनू रीव्सने फक्त एका शब्दासाठी 75 लाख रुपये घेतले. यावरून तो किती महागडा स्टार आहे याचा अंदाज लावता येतो. 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जॉन विक 4' या चित्रपटासाठी केनू रीव्सने 25 दशलक्ष डॉलर्स फी आकारली होती, जी भारतीय चलनात 200 कोटी रुपये आहे. ही रक्कम बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि सलमान यांच्या फीपेक्षा जास्त आहे. 

केनू रीव्सने सिनेमाच्या दुनियेत यश आणि अपयश दोन्ही चाखलं आहे. केनू रीव्सचा चित्रपट 'द मॅट्रिक्स: रिसरेक्शन्स' 2021 साली प्रदर्शित झाला. 'द मॅट्रिक्स' या लोकप्रिय फ्रँचायझीचा हा चित्रपट 18 वर्षांनंतर थिएटरमध्ये दाखल झाला.  'द मॅट्रिक्स: रिसरेक्शन्स' बॉक्स ऑफिसवर मोठा चमत्कार करू शकला नाही.  'द मॅट्रिक्स: रिसरेक्शन्स' बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. असे असूनही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1200 कोटींचा व्यवसाय केला होता. 

टॅग्स :हॉलिवूडसेलिब्रिटीबॉलिवूडशाहरुख खानसलमान खान