Join us  

भारतात आलेल्या केटी पेरीने जाता जाता केली भारतीयांची निराशा, संतापले युजर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2019 3:37 PM

केटीच्या भारत दौ-याची प्रचंड चर्चा झाली. पण जाता जाता केटीने असे काही केले की भारतीयांचा संताप अनावर झाला.

ठळक मुद्दे2010 मध्ये केटी भारतात आली होती. त्यानंतर 2012 मध्येही चेन्नईत आयपीएल उद्घाटन सोहळ्यातही तिने परफॉर्म केला होता.

सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. लाईव्ह कॉन्सर्टमध्ये भाग घेण्यासाठी कालपरवा केटी भारतात आली होती. भारतात तिचे भव्य स्वागत करण्यात आले होते. करण जोहरने केटीसाठी ग्रॅण्ड वेलकम पार्टीचे आयोजन केले होते. बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी या पार्टीत हजेरी लावली होती. या पार्टीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. एकंदर काय तर केटीच्या भारत दौ-याची प्रचंड चर्चा झाली. पण जाता जाता केटीने असे काही केले की भारतीयांचा संताप अनावर झाला.

होय, मुंबईतील लाईव्ह परफॉर्मन्सनंतर केटी काल रात्री मायदेशी परतली. यावेळी  मुंबई एअरपोर्टवर दिसली. साहजिकच मीडियाची संपूर्ण टीम एअरपोर्टवर हजर होती. केटी एअरपोर्टवर येताच अनेक चाहते तिचा ऑटोग्रॉफ घेण्यासाठी समोर आलेत तर पापाराझी तिचे फोटो व व्हिडीओ घेण्यात बिझी झालेत. या गर्दीतून वाट काढत केटी एअरपोर्टवर आत जाण्यासाठी निघाली असता सिक्युरिटीने तिला पासपोर्ट मागितला. पण केटीने सिक्युरिटी पर्सनकडे पूर्णत: दुर्लक्ष केले आणि ती पुढे निघाली. तिच्या मागोमाग येणा-या तिच्या मॅनेजरकडे सिक्युरिटी पर्सनने पासपोर्ट दाखवण्याची विनंती केली. पण तिचा मॅनेजरही पासपोर्ट न दाखवता पुढे गेला. ही संपूर्ण घटना कॅमे-यात कैद झाली. सध्या या व्हिडीओवरून केटीला ट्रोल केले जात आहे.

अनेक युजर्सनी याबद्दल संताप व्यक्त केला आहे. केटीचे हे वागणे युजर्सला अजिबात आवडले नाही. एखाद्या भारतीय सेलिब्रिटीने केटीच्या देशात असे केले असते तर चालले असते का? असा संतप्त सवाल अनेकांनी केला.एकंदर काय तर केटीला भारतीयांनी भरपूर प्रेम दिले. पण जाता जाता केटी भारतीयांना नाराज करून गेली.

2010 मध्ये केटी भारतात आली होती. त्यानंतर 2012 मध्येही चेन्नईत आयपीएल उद्घाटन सोहळ्यातही तिने परफॉर्म केला होता.

टॅग्स :करण जोहरहॉलिवूड