Join us  

जेसिका सिम्पसनच्या पतीची आहे केवळ ही एकच इच्छा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 11:08 AM

जेसिकाने एक अमेरिकन पॉप गायिक, गीतकार व अभिनेत्री आहे. आपल्या पॉप गाण्यांच्या कोट्यवधी प्रती विकल्या गेलेल्या सिम्प्सनला आजवर आंतराराष्ट्रीय स्तरावर अनेक संगीत पुरस्कार मिळाले आहेत.

हॉलिवूडची अतिशय हॉट अन् सेक्सी गायिका व अभिनेत्री जेसिका सिम्पसन ही अलीकडे पतीसोबतच्या तिच्या नात्यावर बोलली. मी आयुष्यभर तरूण दिसावे, अशी माझ्या पतीची इच्छा आहे. त्याला तेच हवे आहे, असे जेसिकाने सांगितले.जेसिका दोन मुलांची आई आहे. पण आजही ती तेवढीच हॉट दिसते, जितकी लग्नापूर्वी दिसायची. सध्या जेसिकाचा बराचसा वेळ मुलांच्या संगोपनात जातो. पण जेसिकाचा पती एरिक जॉन्सन हाही याकामात तिची मदत करतो. कारण जेसिकाला तो थकलेला पाहू शकत नाही. ती नेहमी ताजी टवटवीत दिसावी, असा त्याचा प्रयत्न असतो.

जेसिकाने एक अमेरिकन पॉप गायिक, गीतकार व अभिनेत्री आहे. आपल्या पॉप गाण्यांच्या कोट्यवधी प्रती विकल्या गेलेल्या सिम्प्सनला आजवर आंतराराष्ट्रीय स्तरावर अनेक संगीत पुरस्कार मिळाले आहेत.जेसिकाने २०१४ मध्ये एरिकसोबत लग्न केले होते. त्यापूर्वी चार वर्षे ते एकमेकांना डेट करत होते. जेसिकाने वयाच्या सोळाव्या वर्षी कोलंबिया रेकॉर्ड्ससोबत करार केला होता. १९९९ मध्ये तिचा डेब्यू अल्बम ‘स्वीट किसेज’ रिलीज झाला होता. या अल्बमला अभूतपूर्व लोकप्रीयता मिळाली होती. लव गुरु, प्रायव्हेट व्हॅलेन्टाईन, इंप्लाय अ‍ॅप द मंथ अशा अनेक चित्रपटात ती दिसली आहे.

 

टॅग्स :हॉलिवूड