Join us

Interesting : ​‘या’ महिलेचे वय सांगा पाहू, अंदाज चुकीचा ठरेल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2017 15:47 IST

सोशल मीडियावर एका महिलेचे फोटो खूपच व्हायरल होत असून तिचे फोटो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसत आहे. विशेष म्हणजे ...

सोशल मीडियावर एका महिलेचे फोटो खूपच व्हायरल होत असून तिचे फोटो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसत आहे. विशेष म्हणजे तिच्या वयाचा अंदाज सांगताना बहुतांश लोक चुकत आहेत. तैवान मध्ये राहणारी ल्यूर हू हे त्या महिलेचे नाव असून तिचे वय समजल्यावर लोक विचारात पडत आहेत. ल्यूरला प्रथमदर्शनी पाहिल्यानंतर ती विद्यार्थीनीसारखीच वाटते. मात्र ल्यूर ही व्यवसायाने डिझायनर असून दिसायला अत्यंत सुंदर आणि तरुण आहे. मात्र ती स्टुडंट नसून तिचे वय ४१ वर्ष आहे. तिच्या फिटनेसचे रहस्य म्हणजे ती खूप पाणी पिते आणि भाज्या खाते.ल्यूरची लहान बहीण शेरोन हू ही ३५ वर्षाची असून ती अ‍ॅक्ट्रेस आहे. २०१५ मध्ये एका कार्यक्रमात ल्यूर तिच्याबरोबर गेली असताना त्यावेळी लोकांनी तिला पहिल्यांदा पाहिले. त्याचवर्षी आॅगस्टमध्ये शेरोनने सोशल साइट फेसबूकवर ल्यूरच्या ४० व्या बर्थडेचे फोटो शेयर केले. ल्यूरच्या वयाबाबत समजल्यानंतर तिच्या फॅन्सना धक्काच बसला. कारण चेहऱ्यावर सुरकुत्या नसल्याने ती तरुण मुलगीच दिसते.सोशल साइटवर लाखो फॉलोअर्स सोशल मीडियावर लाखोंच्या संख्येत लोक तिला फॉलो करत आहेत. इन्स्टाग्रामवर सुमारे अडीच लाख लोक तिला फॉलो करतात. तर फेसबूकवर सुमारे साडे तीन लाख लाइक आहेत. नुकतीच ती पुन्हा एकदा तिच्या फोटोमुळे चर्चेत आली आहे. चर्चेत आल्यानंतर ल्यूरही तिच्या बहिणीसारखी स्टार बनली आहे.