Join us
Daily Top 2Weekly Top 5

हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर लोपेज बनली कास्टिंग डिरेक्टर, 'सेकंड अॅक्ट'मधील नायकाची केली निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2018 06:00 IST

हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर लोपेज लवकरच 'सेकंड अॅक्ट' चित्रपटात झळकणार आहे.

ठळक मुद्देजेनिफर लोपेज झळकणार 'सेकंड अॅक्ट' चित्रपटात 'सेकंड अॅक्ट' भारतात ४ जानेवारीला होणार प्रदर्शित

हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर लोपेज लवकरच 'सेकंड अॅक्ट' चित्रपटात झळकणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने कास्टिंग डिरेक्टर बनली. या चित्रपटातील सहकलाकाराची निवड तिने केली आहे. तिने या चित्रपटातील ट्रेच्या भूमिकेसाठी मिलो वेंटिमिग्लियाची निवड केली आहे. 

'सेकंड अॅक्ट' चित्रपटाची कथा माया या महिलेभोवती फिरते. मायाच्या भूमिकेत जेनिफर दिसणार आहे. यातील तिच्या अपोझिट भूमिका ट्रेसाठी मिलो वेंटिमिग्लिया तिची पहिली पसंती होती. त्याच्यासोबत काम करून ती खूप खूश आहे. याबाबत ती म्हणाली की, जेव्हा मी सेकंड अॅक्टची पटकथा वाचत होते. तेव्हा त्यात तिच्या प्रियकराच्या भूमिकेसाठी कोणता अभिनेता योग्य वाटेल, हे मला माहित होते. कारण ट्रेच्या भूमिकेसाठी मला मिलो वेंटिमिग्लिया योग्य वाटला.जेनिफरने पुढे सांगितले की, 'त्याचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला. तो त्याच्या शोमध्ये खूप व्यग्र आहे. मात्र त्याने स्क्रीप्ट वाचली व होकार दिला. जेव्हा आम्ही एकमेकांशी बोललो तेव्हा असे लक्षात आले की आम्हा दोघांनाही अशी कथा असणाऱ्या सिनेमात काम करायचे होते. या चित्रपटात या दोघांची केमिस्ट्री कशी वाटते, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.'पीटर सेगल दिग्दर्शित चित्रपट 'सेकंड अॅक्ट'मध्ये जेनिफर लोपेज व मिलो वेंटिमिग्लिया यांच्यासोबत लीह रेमिनी, वेनेसा हजेंस व ट्रीट विलियम्स हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट भारतात ४ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.