Join us

​ऑस्कर सोहळ्याला देव पटेलने लावली आईसोबत हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2017 12:43 IST

ऑस्कर सोहळ्यात देव पटेलला लायन या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्याचे नामांकन मिळाले होते. हा पुरस्कार देवला मिळवता आला नसला ...

ऑस्कर सोहळ्यात देव पटेलला लायन या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्याचे नामांकन मिळाले होते. हा पुरस्कार देवला मिळवता आला नसला तरी या पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर त्याने आपली छबी सोडली. सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता या पुरस्कारावर महेरशाला अलीने आपली मोहोर उमटवली. त्याला मूनलाईन या चित्रपटासाठी हा पुरस्कार देण्यात आला.या पुरस्कार सोहळ्याला देवने एकटेच हजेरी न लावता तो एका स्पेशल व्यक्तीला या पुरस्कार सोहळ्यासाठी घेऊन गेला आहे. त्याची आई अनिता पटेल या पुरस्कार सोहळ्याला त्याच्यासोबत आहे. पांढऱ्या रंगाच्या टक्सिडोमध्ये तो खूपच छान दिसत असून त्याच्या आईने काळ्या रंगाची साडी घातली आहे आणि त्यावर तिने एकदम थोडासा मेकअप केला आहे. तीदेखील यात खूपच सुरेख दिसत आहे. देवसोबत आई असल्याने तो खूपच खूश आहे. याविषयी तो सांगतो, "ऑस्करचा अनुभव खूपच चांगला आहे. मी माझ्या आईसोबत तिथे उपस्थित असल्याने मी अधिक आनंदित आहे. माझ्यासाठी हा खूपच चांगला आणि खास क्षण आहे. मला यातील प्रत्येक क्षण जगायचा आहे." देवने या चित्रपटातील बालकलाकार सनी पवारचेदेखील यावेळी कौतुक केले. तो सांगतो, "सनी खूपच चांगला अभिनेता आहे."सनीनेदेखील या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली आहे. काळ्या रंगाच्या टक्सिकोमध्ये तो उठून दिसत असून त्यावर त्याने हिरव्या आणि पिवळ्या रंगाचे छान शूज घातले आहेत. लायन या चित्रपटाचे दिग्दर्शन ग्रॅथ डॅव्हिस यांनी केले असून सरू ब्रिले यांच्या खऱ्या आयुष्यावर या चित्रपटाची कथा बेतलेली आहे. गुगल मॅपच्या मदतीने नायक आपल्या कुटुंबांचा कशाप्रकारे शोध घेतो हे चित्रपटात दाखवण्यात आले आहे.