Join us
Daily Top 2Weekly Top 5

जर्मन गायिकेने गायलं "राम आयेंगे"! व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल 'क्या बात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2024 13:14 IST

"राम आयेंगे तो अंगना सजाऊंगी", जर्मन गायिकेचा व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. केवळ देशातच नाही तर जगभरात या सोहळ्याची चर्चा आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक गायकांनी रामललासाठी खास गाणी रेकॉर्ड केली आहेत. अनेक गाण्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना एका जर्मन गायिकेने गायलेल्या गाण्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून "राम आयेंगे" हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. आता एका जर्मन गायिकेने हे गाणं गाऊन नेटकऱ्यांची मनं जिंकून घेतली आहे. जर्मन गायिका Cassandra Mae Spittmann हिने "राम आयेंगे" गाण्याचा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. एका चाहत्याने तिच्याकडे हे गाणं गाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर स्पिटमैनने हे गाणं गाऊन चाहत्यांची मनं जिंकली आहेत. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरी तिचं कौतुकही करत आहेत. 

स्पिटमैनने गायलेलं "राम आयेंगे" हे गाणं चाहत्यांच्या भलतंच पसंतीस उतरलं आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज आणि लाइक्स मिळाले आहे. स्पिटमैनने या आधीही अनेक भक्तीगीतांचे व्हिडिओ शेअर केले आहेत. जर्मन असूनही तिचं भारतावर विशेष प्रेम असल्याचं तिने म्हटलं आहे. "श्रीहरी स्त्रोतम", "श्री हनुमान मंत्र", "गायत्री मंत्र", "राधे राधे", "हर हर महादेव" असे अनेक स्त्रोतांचे व्हिडिओ तिने शेअर केले आहेत. 

टॅग्स :राम मंदिरसेलिब्रिटी