Join us

पतीच्या अटकेची फिशरला वाटतेय भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2016 20:07 IST

हॉलिवूड अभिनेत्री इस्ला फिशर हिला पतीची चिंता सतावत आहे. कारण तिला असे वाटते की, बॅरन कोहेन ज्या पद्धतीच्या चित्रपटाच्या ...

हॉलिवूड अभिनेत्री इस्ला फिशर हिला पतीची चिंता सतावत आहे. कारण तिला असे वाटते की, बॅरन कोहेन ज्या पद्धतीच्या चित्रपटाच्या कथा लिहित आहेत, त्यावरून त्यांना अटक तर होणार नाही ना?एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार कोहेन यांनी गेल्या काही वर्षांमध्ये बºयाचशा वादग्रस्त चित्रपटांच्या कथा लिहिल्या आहेत. त्यामुळे फिशरला भीती वाटत आहे की, ते कायद्याच्या कचाट्यात सापडू नयेत. याविषयी फिशर म्हणते की, मी त्यांना नेहमीच विचारत असते की, आपल्यावर कोणी कायदेशीर खटला तर दाखल केला नाही ना? किंवा तुमच्या अटकेचे वॉरंट तर आले नाही ना? यावर कोहेन यांचे उत्तर असते की, ‘डिक्टेटर’सारखे चित्रपट बनवून देखील कुठल्याही प्रकारच्या कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे लागले नाही, तर मग आता कसली भीती. मात्र फिशरला कोहेनचे हे उत्तर समर्पक वाटत नाही. ती त्यांना नेहमीच कायदेशीर बाबींपासून दूर राहा असा सल्ला देत असते.