Join us

मृत्यूनंतरही हा सेलिब्रिटी कमावतो दरवर्षी कोट्यवधी रुपये !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2017 11:25 IST

cnxoldfiles/एटीव्ही म्युझिक पब्लिशिंग कॅटलॉगमध्ये मायकल जॅक्सनच्या नावे शेअर विकून होणा-या उत्पन्नाचाही समावेश आहे.गेल्या वर्षाच्या अखेरीस मायकेलची कमाई साडेचारशे कोटी ...

cnxoldfiles/एटीव्ही म्युझिक पब्लिशिंग कॅटलॉगमध्ये मायकल जॅक्सनच्या नावे शेअर विकून होणा-या उत्पन्नाचाही समावेश आहे.गेल्या वर्षाच्या अखेरीस मायकेलची कमाई साडेचारशे कोटी इतकी होती. केवळ २०१२ या वर्षाचा अपवाद वगळता मृत सेलिब्रिटींच्या कमाईच्या यादीत तो सर्वोच्च स्थानावर आहे. या टॉप टेन यादीत अलबर्ट आइन्स्टाईन यांचं नावही आहे. ते अजूनही दरवर्षी 6 कोटी रुपयांची कमाई करतात. 62 वर्षांपूर्वी अलबर्ट आईन्स्टाईन यांचं निधन झालंय. मात्र विज्ञानाच्या अनेक सिद्धांताचे परवाने आइन्स्टाईन यांच्या नावावर आहेत. त्याची रॉयल्टी त्यांना आजही मिळते. मायकेल जॅक्सन, आईन्स्टाईन यांच्याशिवाय फोर्ब्सच्या या टॉप टेन यादीत बॉब मार्ले, जॉन लेनन, आर्नोल्ड पामर, आणि चार्ल्स शुल्ज यांचाही समावेश आहे.दुस-या स्थानावर कार्टूनिस्ट चार्ल्स एम. शुल्ज हा आहे. मात्र चार्ल्स आणि मायकलच्या कमाईत खूप अंतर आहे.मात्र मायकलची वर्षभरातील कमाईचा आकडा पाहता आजही मायकेल जॅक्सनची जादू कमी झालेली नाहीय हेच यावरून पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे.