Join us  

डोनाल्ड ट्रम्प यांच्या बायोपिकवरुन वाद! Ex पत्नीवर बलात्कार ते अंडरवर्ल्ड कनेक्शन, धक्कादायक गोष्टींचा उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 3:19 PM

कान्स फेस्टिव्हलमध्ये 'द अपरेंटिस'चा प्रिमियर शो दाखविण्यात आला. पण, त्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या बायोपिकमध्ये दाखवल्या गेलेल्या काही सीन्सवरुन डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीमकडून आक्षेप घेण्यात आला आहे.

अमेरिकेचे पूर्व राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या जीवनावर आधारित 'द अपरेंटिस' या बायोपिकवरुन वाद निर्माण झाला आहे. कान्स फेस्टिव्हलमध्ये 'द अपरेंटिस'चा प्रिमियर शो दाखविण्यात आला. पण, त्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या बायोपिकमध्ये दाखवल्या गेलेल्या काही सीन्सवरुन डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीमकडून आक्षेप घेण्यात आला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या बायोपिकचा कान्स फेस्टिव्हलमध्ये प्रिमियर शो पार पडला. त्यानंतर ८ मिनिटे प्रेक्षकांकडून 'द अपरेंटिस' सिनेमाला स्टँडिंग ओव्हेशन मिळालं. पण, या बायोपिकमध्ये अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. 'द अपरेंटिस'मध्ये डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्रपती होण्याआधीचा काळ दाखविण्यात आला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या जीवनातील १९७० ते ८० या दशकातील घटनांबाबत या सिनेमातून प्रकाश टाकण्यात आला आहे. यामध्ये डोनाल्ड ट्र्म्प त्यांच्या एक्स दिवंगत पत्नी इवाना यांच्यावर बलात्कार करत असल्याचं दाखविण्यात आलं आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांचे अंडरवर्ल्डशीही कनेक्शन असल्याचा दावा या सिनेमात केला गेला आहे. ट्रम्प टॉवरचं स्वप्न पू्र्ण करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी अंडरवर्ल्डमधील लोकांशी  करार केल्याचं या सिनेमात दाखविण्यात आलं आहे. याबाबत ट्रम्प यांच्या टीमकडून "आम्ही या निर्मात्यांविरोधात चुकीच्या आणि खोट्या गोष्टी दाखवल्याप्रकरणी तक्रार दाखल करणार आहोत. हा सिनेमा म्हणजे कचरा आहे," असं म्हणण्यात आलं आहे.  हा सिनेमा अमेरिकेत प्रदर्शित होऊ नये यासाठी 'द अपरेंटिस'विरोधात डोनाल्ड ट्रम्प अॅक्शन घेण्याच्या तयारीत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या 'द अपरेंटिस' या सिनेमात अभिनेता सेबेस्टियन स्टेन मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमात त्याने डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका साकारली आहे. या सिनेमाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. पण, 'द अपरेंटिस'ची रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. 

टॅग्स :डोनाल्ड ट्रम्पसिनेमाअमेरिका