Join us

ड्रग्जच्या अतिसेवनाने बिघडली प्रकृती! डेमी लोवेटो रूग्णालयात!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2018 14:52 IST

 हॉलिवूडची लोकप्रीय गायिका व अभिनेत्री डेमी लोवेटो हिला रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. ड्रग्जच्या अतिसेवनाने डेमीची प्रकृती बिघडली. 

 हॉलिवूडची लोकप्रीय गायिका व अभिनेत्री डेमी लोवेटो हिला रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. ड्रग्जच्या अतिसेवनाने डेमीची प्रकृती बिघडली. यानंतर तिला गंभीर अवस्थेत रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे कळते. अर्थात डेमीच्या काही निकटस्थांनी या बातमीचे खंडन केले आहे.सोमवारी डेमीने आपल्या एका मित्राच्या बर्थ डे पार्टीत दिसली होती. या पार्टीचे फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. सर्व फोटोत डेमी अतिशय आनंदी दिसत होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी डेमीची प्रकृती बिघडली. यानंतर तिला लगेच रूग्णालयात हलवण्यात आले. डेमी घरात बेशुद्धावस्थेत सापडली, असेही सांगितले जातेय.दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा कथित बॉयफ्रेन्ड निक जोनास या दोघांनीही डेनी लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना केली आहे. दोघेही आपआपल्या ट्विटर डेनीच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी कामना करताना दिसले. ‘डेमी लोवेटोला खूप सारे प्रेम़ तिच्यासाठी प्रार्थना करा,’असे प्रियांकाने लिहिले. तुम्हाला कदाचित ठाऊक नसेल पण डेमी निकचा भाऊ जो जोनाससोबत रिलेशनशिपमध्ये होती.

टॅग्स :हॉलिवूड