Join us  

या सेलिब्रेटीला झाली कोरोनाची लागण? वाचा काय आहे सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 3:59 PM

कोरोनो व्हायरसने सध्या जगभरात थैमान घातले असून अनेकांना यामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत.

ठळक मुद्देबीबीसीच्या फेक ट्विटर अकाऊंटवरून हॅरी पॉटर फेम डॅनियल रॅडक्लिफला कोरोनाची लागण झाली असल्याचे ट्वीट काही तासांपूर्वी करण्यात आले होते. हे ट्वीट प्रचंड व्हायरल झाल्यानंतर आता डॅनियलच्या प्रतिनिधीने ही केवळ एक अफवा असल्याचे म्हटले आहे.

हॅरी पॉटर या चित्रपटाने अनेक पिढ्यांवर राज्य केले आहे. या चित्रपटाचे सगळेच भाग हिट ठरले आहेत. या चित्रपटात हॅरी पॉटरची मुख्य भूमिका डॅनियल रॅडक्लिफने साकारली होती. डॅनियलला या चित्रपटामुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. डॅनियल जगभरात लोकप्रिय असून सध्या एका वेगळ्याच कारणामुळे तो चर्चेत आला आहे.

एका अभिनेत्याच्या बाबतीत लोकांनी अफवा पसरवणे यात काही नवीन नाही. पण आता डॅनियलच्या बाबतीत एक भयानक अफवा सोशल मीडियाद्वारे पसरवण्यात आली आहे.

कोरोनो व्हायरसने सध्या जगभरात थैमान घातले असून अनेकांना यामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. आता सिनेसृष्टीतील एका प्रसिद्ध अभिनेत्याला कोरोनाची लागण झाली असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली आहे. आएएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, बीबीसीच्या फेक ट्विटर अकाऊंटवरून हॅरी पॉटर फेम डॅनियल रॅडक्लिफला कोरोनाची लागण झाली असल्याचे ट्वीट काही तासांपूर्वी करण्यात आले होते. हे ट्वीट प्रचंड व्हायरल झाल्यानंतर आता डॅनियलच्या प्रतिनिधीने ही केवळ एक अफवा असल्याचे म्हटले आहे. एवढेच नव्हे तर आता हे ट्वीट देखील डीलिट करण्यात आले आहे.

टॅग्स :हॉलिवूडकोरोना वायरस बातम्या