Join us

Break Up : ओरलॅण्डोला केटी पेरीसोबत थाटायचा नव्हता संसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2017 21:57 IST

हॉलिवूड अभिनेता ओरलॅण्डो याने गायिका केटी पेरी हिच्याशी या कारणाने ब्रेकअप केले की, त्याला तिच्यासोबत संसार थाटायचा नव्हता. काही ...

हॉलिवूड अभिनेता ओरलॅण्डो याने गायिका केटी पेरी हिच्याशी या कारणाने ब्रेकअप केले की, त्याला तिच्यासोबत संसार थाटायचा नव्हता. काही दिवसांपूर्वीच पेरी आणि ओरलॅण्डो विभक्त झाले होते. त्यांच्या या ब्रेकअपचे कारण फारसे समोर आले नसल्याने त्यांच्या फॅन्समध्ये चर्चेला उधाण आले होते. अखेर ओरलॅण्डो यानेच याविषयी खुलासा करून चर्चेला पूर्णविराम दिला आहे. मिरर डॉट कॉ डॉट यूके या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, तब्बल एक वर्ष एकत्र राहिलेले हे जोडपे त्यांच्यातील नात्याप्रती फारसे गंभीर नव्हते. एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार ‘केटी आणि ओरलॅण्डो यांनी एक वर्ष एकत्र राहताना एकमेकांसोबत चांगला वेळ व्यतित केला. ओरलॅण्डो याचा मिरांडासोबतचा घटस्फोट झालेला असल्याने त्यातून बाहेर पडण्यासाठी त्याला केटीने चांगली साथ दिली होती. मात्र, दोघांमध्ये वैचारिक ताळमेळ बसत नसल्याने त्यांनी विभक्त होण्याचा विचार केला. पुढे ते दोघे एकमेकांसाठी बनलेले नाहीत, असा विचार पुढे आला अन् त्यांनी एकमेकांपासून दूर होण्याचा निर्णय घेतला. मात्र एका विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केटी पेरी ओरलॅण्डोसोबत विवाह करू इच्छित होती. एवढेच नव्हे तर त्याच्या मुलाची आई बनण्यासही ती उत्सुक होती. तर ओरलॅण्डो अगोदरच एका मुलाचा बाप असून, त्याला केटीची हिच बाब खटकत होती. त्याला केटीशी लग्न करायचे नव्हते. मात्र ३२ वर्षीय केटीला अधिक काळ नात्यात राहायचे नव्हते. ती सातत्याने ओरलॅण्डोला लग्नासाठी गळ घालत होती. यामुळे ओरलॅण्डो याच्यावर दबावही निर्माण झाला होता. अखेर त्याने तिच्यापासून दूर जाणे पसंत केले. मात्र या दोघांच्याही चाहत्यांना त्यांनी एकत्र यावे, अशी अपेक्षा होती.