Join us

‘वोग’च्या कव्हरपेजवर झळकली प्लस साईज मॉडेल! पाहा, व्हिडिओ!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2018 19:46 IST

जगप्रसिद्ध मॅगझिनच्या कव्हरपेजवर प्लस साईजच्या मॉडेलला जराही स्थान नाही, हा अलिखित नियम काळासोबत मोडीत निघणार आहे.  होय, जगप्रसिद्ध  vogue Arabia या मॅगझिनच्या कव्हरपेजवर प्लस साईज मॉडेल झळकली आहे.

जगप्रसिद्ध मॅगझिनच्या कव्हरपेजवर झळकायचे असेल तर काय हवे? कमनीय बांधा, सेक्सी अन् ग्लॅमरस लूक असेच याचे उत्तर मिळेल. प्लस साईजच्या मॉडेलला तर या कव्हरपेजवर जराही स्थान नाही. पण थांबा, कदाचित आता हे सगळे काळासोबत मोडीत निघणार आहे. होय, जगप्रसिद्ध  vogue Arabia या मॅगझिनच्या कव्हरपेजवर प्लस साईज मॉडेल झळकली आहे. होय, हॉलिवूडची प्लस साईज मॉडेल एश्ले ग्राहम हिने  vogue Arabiaसाठी अतिशय शानदार फोटोशूट केले. या फोटोशूटमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

 vogue Arabia सध्या प्रत्येक शेप आणि साईजच्या मॉडेलचे फोटोशूट करत आहे. यादरम्यान त्यांनी एश्ले ग्राहम हिचेही फोटोशूट केले. तिच्यासोबत अन्य काही प्लस साईज मॉडेलही या फोटोशूटमध्ये आहेत. या फोटोशूटचा एक स्टनिंग व्हिडिओही  vogue Arabiaने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.या व्हिडिओत एश्ले वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. एश्ले ग्राहमचे ७ कोटींवर फॉलोअर्स आहेत. आपल्या या ताज्या फोटोशूटचे फोटो तिने शेअर केले आहेत. एश्लेने अनेक बोल्ड व सेक्सी फोटोशूट्स केले आहेत. अनेक फोटोशूटमध्ये तिने न्यूड पोजही दिल्या आहेत. तूर्तास एश्ले पॅरिसमध्ये आहे आणि इथे सुट्टीचा आनंद लुटत आहे.

 

टॅग्स :अॅश्ले ग्राहम