Join us

हेच पाहणं बाकी होत.. परफॉर्मन्सदरम्यान या सेलिब्रेटीनं चाहत्यांमध्ये फेकला विग, आता म्हणतेय द्या परत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 17:04 IST

आघाडीची अमेरिकन रॅपर कार्डी बीच्या नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात एक अजबच घटना घडली आहे.

आघाडीची अमेरिकन रॅपर कार्डी बीच्या नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात एक अजबच घटना घडली आहे. या घटनेसाठी तिच जबाबदार आहे. लंडनमधील फिन्सबर्ग पार्क येथे नुकताच वायरलेस फेस्टिव्हल पार पडला. या फेस्टिव्हलमध्ये कार्डी बीनेदेखील परफॉर्म केले. या परफॉर्मन्सदरम्यान चाहत्यांचा उत्साह पाहून तिने गाता गाता स्टेजवर अचानक डोक्यावरचा विग काढून प्रेक्षकांमध्ये भिरकावला. तिने उत्साहाच्या भरात भिरकावलेला विग आता ती परत मागतेय. तिने चाहत्यांना तो विग परत देण्याची विनंती सोशल मीडियावर केली आहे.

कार्डी बीने परफॉर्मन्स दरम्यान भिरकावलेल्या विगचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. तिने विग फेकल्यानंतर तो विग मिळवण्यासाठी चाहत्यांमध्ये झालेली चढाओढदेखील व्हिडिओत पहायला मिळतेय. परफॉर्मन्सच्या नादात मी विग फेकला. पण, मला परत द्या अशी विनंती तिने सोशल मीडियावर दिली आहे. 

तिने ट्विट केलं की, मला माझा विग परत हवा आहे. परफॉर्मन्सच्या धुंदीत मी तो चाहत्यांकडे भिरकावला. ज्या कोणाकडे तो विग असेल त्याने मला थेट मेसेज करा.

कार्डी बीला तिने केलेली गोष्ट तिच्याच अंगाशी आली आहे.

त्यामुळे आता तिला तिचा विग परत मिळेल की नाही, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.