Join us

कोरोना व्हायरसमुळे या गायकाचे झाले निधन, टॉम हँक्सने वाहिली सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 18:30 IST

या गायकाच्या निधनाने त्याच्या फॅन्सना चांगलाच धक्का बसला आहे.

ठळक मुद्देगायक एडमचे कोरोना व्हायरसमुळे निधन झाले असून त्यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे.

कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून या साथीला महारोगराई घोषित करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टड्रॉस गेब्रेयेसस यांनी जिनेव्हामध्ये म्हटलं आहे की, कोरोनाला आता जागतिक महामारी म्हटलं जाऊ शकतं. यासारखी महामारी कधी पाहण्यात आलेली नव्हती. कोरोनामुळे जगभरातील अनेकांना आजवर आपले प्राण गमवावे लागले आहेत. एका प्रसिद्ध गायकाचे नुकतेच कोरोना व्हायरसची लागण झाल्याने निधन झाले आहे.

गायक एडमचे कोरोना व्हायरसमुळे निधन झाले असून त्यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. त्यांना मानाचे मानले जाणारे एमी आणि ग्रॅमी यांसारखे पुरस्कार देखील मिळाले आहेत. एडमचे निधन न्यूयॉर्कमध्ये झाले असून त्यांच्या निधनाच्या वृत्ताने सिनेजगतात शोककळा पसरली आहे. अभिनेता टॉम हँक्सने देखील सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ट्वीट करत अतिशय वाईट गोष्ट घडली असे म्हटले आहे. 

नव्वदीच्या दशकात गाजलेल्या फाऊंडेन ऑफ वेन या म्युझिक बँडचे एडम एक हिस्सा होते. याशिवाय त्यांनी स्टेकीस मॉम आणि ज्युलीसारखी हिट गाणी दिले आहेत. त्यांना २००९ मध्ये ग्रॅमी पुरस्कार मिळाला होता. कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. खबरदारी म्हणून भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केला आहे. त्यामुळे २१ दिवस देशातील सगळेच कामकाज ठप्प झाले आहे. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या