Join us
Daily Top 2Weekly Top 5

रोहित-जुईलीने केलं त्यांचं पहिलं मॅशअप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 09:37 IST

गेल्या काही महिन्यांपासून रोहित-जुईलीच्या चाहत्यांची ह्या दोघांनीही एकत्र एक डुएट गावे अशी मागणी होती.

ठळक मुद्देतोळा-तोळा हे गाणे ‘तूहिरे’ सिनेमामध्ये तेजस्विनी पंडित आणि सई ताम्हणकरने गायले

रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरने आपल्या सुमधूर गीतांनी कानसेनांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केले आहे. ह्या दोघांनी एकत्र अनेक कॉन्सर्ट गाजवल्या असल्या तरीही रोहित-जुईलीने कधीही एकत्र पार्श्वगायन केले नव्हते. त्यामुळेच गेल्या काही महिन्यांपासून रोहित-जुईलीच्या चाहत्यांची ह्या दोघांनीही एकत्र एक डुएट गावे अशी मागणी होती. चाहत्यांची ही इच्छा आता ‘तोळा तोळा- दिल दिया गल्ला’ ह्या रोहित-जुईलीच्या मॅशअपमूळे पूर्ण झाली आहे.

 

रोहित राऊत ह्याविषयी सांगतो, “जुईली आणि मी नुकतेच सोशल मीडियावरून एक लाइव सेशन केले होते. ह्या लाइव सेशनमध्ये ब-याच चाहत्यांनी तुम्ही एकत्र येऊन गावे, असा आग्रह धरला. त्यामुळेच मग एका इम्प्रॉम्पटिव्ह सेशनमधून हे गाणे आकाराला आले.”  

तोळा-तोळा हे गाणे संजय जाधव ह्यांच्या ‘तूहिरे’ सिनेमामध्ये तेजस्विनी पंडित आणि सई ताम्हणकरने गायले होते. सोशल मीडियावर रोहितचे गाणे येताच तेजस्विनीने त्याला एका व्हिडीयोव्दारे शुभेच्छा दिल्यात.  

तेजस्विनी म्हणते, “ तूहिरे आणि तोळा तोळा माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. माझ्यासाठी आणि सईसाठी ‘गाणं गायचं’ हा एक टास्कच होता. आता त्या आठवणींना रोहित-जुईलीच्या ह्या मॅशअपमूळे उजाळा मिळाला आहे. एन्ड एज युजवल यु रॉक्ड दिस साँग एज वेल”  

जुईली जोगळेकर म्हणते, “तेजस्विनीने आम्हांला व्हिडीयोव्दारे शुभेच्छा देणे ही आमच्यासाठी खूप मोठी कॉम्पलिमेन्ट आहे. त्यासाठी मी तिची खूप खूप आभारी आहे. हे गाणे आमच्या चाहत्यांनाही आवडेल अशी माझी अपेक्षा आहे.” ​​

टॅग्स :तेजस्विनी पंडित