Join us
Daily Top 2Weekly Top 5

वयाच्या ४१ व्या वर्षी प्रसिद्ध टीव्ही अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा! पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 11:31 IST

वयाच्या ४१ व्या वर्षी प्रसिद्ध टीव्ही अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा! पोस्ट शेअर करत दिली दिली गुडन्यूज 

Nakuul Mehta : अभिनेता नकुल मेहता (Nakuul Mehta) हा हिंदी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. 'प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा', 'इश्कबाज' आणि 'बडे अच्छे लगते हैं 2 आणि 3' यांसारख्या गाजलेल्या टीव्ही मालिकांमध्ये मुख्य त्याने मुख्य भूमिका साकारल्या आहेत. नुकतीच  अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. ही गुडन्यूज म्हणजे अभिनेता नकुल मेहता लवकरच पुन्हा एकदा बाबा होणार आहे. त्याची पत्नी गरोदर असून त्यांच्या घरी चिमुकल्या बाळाचं आगमन होणार आहे.

नुकतीच नकुल आणि त्याची पत्नी जानकी पारेख यांनी सोशल मीडियावर खास अंदाजात फोटो शेअर करत आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्यामुळे संपूर्ण कलाविश्वातून या जोडप्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. नकुल मेहताने पत्नी जानकी आणि मुलगा सुफीसोबत खास मॅटर्निटी फोटोशूट करत हे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. ‘सूफी आता जबाबदारी आणखी वाढली आहे आणि आम्ही पुन्हा एकदा आशीर्वाद स्वीकारत आहोत... अशा आशयाची पोस्ट त्याने लिहिली आहे. 

दरम्यान, अभिनेता नकुल मेहता आणि जानकी पारेख यांनी २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. या जोडप्याला एक ५ वर्षांचा गोंडस मुलगा देखील आहे. त्यांतर अभिनेता आता वयाच्या ४१ व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. अभिनेता नकुल मेहताची पत्नी जानकी पारेख एक गायिका आहे. शिवाय तिचे अनेक गाण्यांचे व्हिडिओ YouTube वर खूप लोकप्रिय आहेत.

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया