अभिनेत्री हिना खान (Hina Khan) ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत आहे. याही परिस्थितीत ती शक्य तितकं पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या हिनाच्या पाच ते सहा किमोथेरपी झाल्या आहेत. यादरम्यान तिचे केस गळून पडले आहेत. नुकतीच ती मालदीवला जाऊन आली. तिथे तिने खूप एन्जॉय केलं. आता ती पुन्हा भारतात आली आहे. विशेष म्हणजे ती बिग बॉस १८ (Bigg Boss 18) मध्ये हजेरी लावणार आहे. किमोथेरपीनंतर ती पहिल्यांदाच टीव्हीवर दिसणार आहे.
हिना खानला गेले काही दिवस आपण रॅम्प शो, अवॉर्ड सोहळ्यात बघितले. कॅन्सरचे निदान झाल्यापासून ती टीव्हीवर मात्र दिसलीच नव्हती. तिला अभिनयातून ब्रेक घ्यावा लागला आहे. अशातच ती आता बिग बॉस १८ मध्ये येत आहे. स्पेशल गेस्ट म्हणून ती हजेरी लावणार आहे. हिना बिग बॉस ११ ची रनर अप होती. नंतर ती बिग बॉस १४ मध्येही मेंटर म्हणून आली होती. आता बिग बॉस १८ मध्ये तिला पाहुणी म्हणून आमंत्रित करण्यात आलं आहे. ती स्पर्धकांना कोणते सल्ले देते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. तसंच सलमान खान आणि हिना पुन्हा एकत्र स्क्रीनवर दिसणार आहेत यासाठी हिनाचे चाहते उत्सुक आहेत.
हिना खान कॅन्सरशी लढा देत असतानाच सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असते. इतर कॅन्सर पीडित रुग्णांना ती मोटिवेशन देत असते. त्यामुळे तिचं खूप कौतुकही होतंय. अनेक कलाकार तिच्या या प्रवासात तिची साथ देत आहे. तसंच तिचा बॉयफ्रेंडही खंबीरपणे पाठीशी उभा आहे. हिनाला बऱ्याच काळाने टीव्हीवर पाहता येणार असल्याने चाहतेही आनंदी आहेत.