Join us

'राम तेरी गंगा मैली' फेम मंदाकिनीच्या मुलाला पाहिलंत का?, पर्सनॅलिटीत अभिनेत्यांनाही देतो टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 18:48 IST

Actress Mandakini : अभिनेत्री मंदाकिनी फारशी बॉलिवूडमध्ये सक्रीय नसली तरी ती चर्चेत येत असते.

बॉलिवूड अभिनेत्री मंदाकिनी (Actress Mandakini) १९८५ साली रिलीज झालेल्या 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटात ती राजीव कपूरसोबत दिसली होती. या चित्रपटातील तिची निरागसता आणि सौंदर्य लोकांना पटले. या चित्रपटामुळे ती रातोरात स्टार झाली. मात्र, नंतर ती चित्रपटांपासून दुरावली आणि आता मंदाकिनीने २८ वर्षांनी पुनरागमन केल्याने ती चर्चेत आली आहे. लोकांना तिचे कुटुंब, पती आणि मुलांबद्दल जाणून घ्यायचे आहे. मंदाकिनीही पुनरागमनामुळे खूप खूश आहे. पण आज आम्ही तुम्हाला मंदाकिनीचा एकुलता एक मुलगा रब्बिलची ओळख करून देणार आहोत.

मंदाकिनीच्या एकुलत्या एक मुलाचे नाव रब्बिल ठाकूर आहे. तो त्याची आई मंदाकिनी सारखाच गोंडस आणि हँडसम दिसतो. मंदाकिनीने अलीकडेच सांगितले होते की, ती तिच्या मुलासाठी साजन अग्रवालच्या म्युझिक व्हिडिओमध्ये काम करण्यास तयार झाली होती. आईच्या भावनांवर आधारित या गाण्यात ती तिचा मुलगा रब्बीलसोबत दिसली होती, ज्याचे शीर्षक 'मा ओ मा' आहे.

मंदाकिनीचा मुलगा रब्बिल खूप देखणा आहे आणि लूकमध्ये तो मोठ्या नायकांनाही मागे टाकतो. रब्बिल इतर स्टार किड्सइतका प्रसिद्ध नाही ही वेगळी गोष्ट आहे, परंतु व्यक्तिमत्त्वात तो एखाद्या लीजेंडपेक्षा कमी नाही. मंदाकिनी राम तेरी गंगा मैलीनंतर 'डान्स डान्स', 'लडाई', 'कहां है कानून', 'नाग नागिन', 'प्यार के नाम कुर्बान', 'प्यार करके देखो' यांसारख्या अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये दिसली. मंदाकिनी शेवटची १९९६ मध्ये रिलीज झालेल्या 'जोरदार' चित्रपटात गोविंदा, आदित्य पांचोली आणि नीलम कोठारीसोबत दिसली होती.

टॅग्स :मंदाकिनी