Join us
Daily Top 2Weekly Top 5

हॉट बिपाशा बासूचा बिकिनी अंदाज तुम्ही पाहिला? फोटो पाहून व्हाल घायाळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 17:09 IST

बिपाशा बासू ही त्यांपैकीच एक़ तिनेही तिचा अभिनय, लूक्स यांच्या जोरावर चाहत्यांची मनं जिंकली. नुकतीच ती तिचा पती करणसिंग ग्रोव्हरसोबत सुट्टयांचा एन्जॉय करताना दिसली.

बॉलिवूडमध्ये बंगाली बालांची कमी नाही. त्यांनी आज त्यांच्या मादक अदा, लूक्स यांनी चाहत्यांवर मोहिनी घातलीय. त्यांच्या चाहत्यांनीही त्यांच्यावर खूप प्रेम केलं. बिपाशा बासू ही त्यांपैकीच एक़ तिनेही तिचा अभिनय, लूक्स यांच्या जोरावर चाहत्यांची मनं जिंकली. नुकतीच ती तिचा पती करणसिंग ग्रोव्हरसोबत सुट्टयांचा एन्जॉय करताना दिसली. समुद्रकिनाऱ्यावर ती बिकिनी अंदाजात दिसली. तिचा हा अंदाज पाहून तुम्ही नक्की घायाळ व्हाल, यात काही शंका नाही. 

सध्या बॉलिवूडमधील हॉट आणि होल्ड अभिनेत्री बिपाशा बासू पती करण सिंह ग्रोवरसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. दरम्यान तिने तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. बिपाशा सुमद्र किनारी सुट्ट्यांचा आनंद लुटताना दिसत आहे. समुद्राच्या पाण्याला मॅचिंग निळ्या रंगाची बिकिनी बिपाशाने परिधान केली असल्याचे दिसत आहे. नो मेकअप लूक आणि बिकिनीमध्ये बिपाशा अतिशय बोल्ड अंदाजात दिसत आहे. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

बिपाशा आणि तिचा पती करण या दोघांनाही फिरण्याची आवड असल्यामुळे ते सतत फिरताना दिसतात. बिपाशा २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या अलोन चित्रपटात दिसली होती. त्यानंतर ती चित्रपटसृष्टीपासून लांब असल्याचे पाहायला मिळते. अलोन चित्रपटात बिपाशा आणि करण मुख्य भूमिकेत दिसले होते. बिपाशा करणसोबत समुद्र किनारी एकत्र वेळ घालवताना दिसत आहे.

टॅग्स :बिपाशा बासूकरण सिंग ग्रोव्हर