Join us  

"किती दिवस बापाच्या पैशावर.."; म्हणत अनिल कपूरच्या लेकाला केलं ट्रोल, हर्षवर्धनने दिलं सणसणीत उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 11:18 AM

अनिल कपूर यांचा लेक हर्षवर्धन कपूरला बापाच्या पैशावर जगतो असं म्हणत ट्रोल केलंय. यावर हर्षवर्धनने दिलेलं सणसणीत उत्तर चर्चेत आहे (harshavardhan kapoor, anil kapoor)

अनिल कपूर हे बॉलिवूडमधले चिरतरुण अभिनेते. अनिल यांनी गेली अनेक वर्ष विविध सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. अनिल यांना जेवढी प्रसिद्धी मिळाली तितकी त्यांचा लेक हर्षवर्धनला मिळाली नाही. हर्षवर्धनने अभिनय केलेले सिनेमे बॉक्स ऑफीसवर कमाल दाखवू शकले नाहीत. अशातच हर्षवर्धनला सोशल मीडियावर याच मुद्द्याला धरुन एका व्यक्तीने ट्रोल केलंय. त्या युजरला हर्षवर्धननेही सणसणीत उत्तर दिलंय. काय घडलंय नेमकं?

सोशल मीडियावर एक स्क्रीनशॉट व्हायरल झालाय. यात अनिल कपूर यांचा लेक हर्षवर्धनला एक युजर म्हणाला की, "कधीतरी एखादा चांगला सिनेमा कर. किती वेळ आपल्या बापाच्या पैशांवर जगत स्नीकर्स खरेदी करशील?" यावर हर्षवर्धनने रिप्लाय दिला की,  "मला तुझे सिनेमे कुठे बघायला मिळतील? तू आयुष्यात किती सिनेमे केलेस? मी आतापर्यंत रे, थार, AK vs AK,  मिर्झाया, भावेश जोशी हे सिनेमे केलेत? तू आहेस कोण? ज्याचा काही संबंध नाही असा एक अपयशी माणून जो फक्त ट्विटरवर गरळ ओकतो आणि लोकं श्रीमंत झाली म्हणून त्यांना सपोर्ट करतो."

हर्षवर्धनने दिलेला हा रिप्लाय सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. हर्षवर्धन याआधीही ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला. जेव्हा त्याने डेव्हिड बॅकहमसोबत फोटो पोस्ट केला होता. २०१६ ला हर्षवर्धनने त्याच्या करिअरची सुरुवात केली. हर्षवर्धनची बहिण सोनम कपूर आणि वडिल अनिल कपूर यांना बॉलिवूडमध्ये जितकी प्रसिद्धी मिळाली तितकी हर्षवर्धनला मिळाली नाही. तरीही हर्षवर्धन सिनेमांत अभिनय करुन ओळख मिळवण्याचा प्रयत्न करतोय.

टॅग्स :अनिल कपूरसोनम कपूरट्विटर