Join us

Hardik Pandya wife Natasa Stankovic Video: हार्दिकची पत्नी नताशा स्टँकोविकचा स्विमिंग पूलमधला हॉट व्हिडीओ व्हायरल; हार्दिकनेही केली कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 20:24 IST

नताशाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला व्हिडीओ

Hardik Pandya wife Natasa Stankovic Video: भारताचा तडाखेबाज ऑलराऊंडर हार्दिक पांड्या सध्या चांगल्या लयीत आहे. सुमारे ७-८ महिने क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर IPL 2022 च्या निमित्ताने त्याने क्रिकेटच्या मैदानात कमबॅक केले. हार्दिकची टी२० विश्वचषकासाठी निवड झालेली असताना त्याच्या गोलंदाजी न करण्यावर टीका झाली. पण यंदाच्या IPL हंगामात तो फिट होऊन परतला आणि साऱ्यांची बोलती त्याने बंद केली. हार्दिक चर्चेत असतानाच आता त्याची पत्नी नताशा स्टँकोविक हीदेखील तिच्या हॉट व्हिडीओमुळे चर्चेत आहे.

नताशा ही एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. हार्दिकशी लग्न होण्याआधी तिने अनेक म्युझीक व्हिडीओ आणि चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. बोल्ड मॉडेल अशी तिची ओळख आहे. तिचा तशातच पद्धतीचा एक व्हिडीओ सध्या तुफान चर्चेत आला आहे. आपल्या स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नताशाने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. नताशा स्विमिंग पूलच्या पाण्यात पोहोतानाच मध्येच पाण्यातून बाहेर येत असल्याचा तो व्हिडीओ आहे. या व्हिडीओची चांगलीच चर्चा रंगली आहे. पाहा तो व्हिडीओ-

नताशाच्या या व्हिडीओला भरपूर लाईक्स मिळाले आहेत. पती हार्दिक पांड्यानेही तिचा हा व्हिडीओ लाईक केला असून कमेंटही केली आहे. त्याने एक हार्टचं इमोजी टाकलं आहे आणि त्यासोबत आगीचा इमोजी टाकून हॉटनेसबद्दल कमेंट केली आहे.

दरम्यान, हार्दिक सध्या IPL 2022 मध्ये गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्व करत आहे. पहिल्या आठवड्यात झालेल्या दोनही सामन्यांत हार्दिकच्या संघाचा विजय झाला. पहिल्या सामन्यात त्यांनी नवा संघ लखनौ सुपर जायंट्स यांना पराभूत केलं. तर दुसऱ्या सामन्यात दिल्लीच्या संघाला धूळ चारली.

 

टॅग्स :नताशा स्टँकोव्हिचहार्दिक पांड्यागुजरात टायटन्ससोशल व्हायरल