Join us

'गोविंदा कुठे आहे?', पापाराझींनी प्रश्न विचारताच सुनिता आहुजाने केलं दुर्लक्ष; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 10:57 IST

गोविंदाची पत्नी सुनिता आहुजाने नुकतीच एका कार्यक्रमात हजेरी लावली.

अभिनेता गोविंदा (Govinda) आणि पत्नी सुनिता आहुजा (Sunita Ahuja) यांच्या घटस्फोटाची काही दिवसांपूर्वी खूप चर्चा रंगली होती. सुनिताने काही महिन्यांपूर्वी गोविंदाला घटस्फोटाची नोटीस पाठवल्याचंही समोर आलं होतं. तसंच दोघंही वेगवेगळ्या घरात राहत असल्याचंही समजलं. यावरुन त्यांचा घटस्फोट नक्की होणार असंच वाटत होतं. पण नंतर सुनिताने या चर्चा नाकारत स्पष्टीकरण दिलं होतं. आता नुकतंच सुनिता मुलगा यशवर्धनसह एका कार्यक्रमात आली होती. तिथे 'गोविंदा कुठे आहे' असा प्रश्न विचारला असता तिने थेट दुर्लक्ष केलं. 

सुनिता आहुजाने नुकतीच एका कार्यक्रमात हजेरी लावली. तिचा स्वॅग कायमच हटके असतो. तसंच तिचा भारदस्त आवाज लक्ष वेधून घेतो. पूर्ण सिल्व्हर शायनिंग को ऑर्ड सेटमध्ये ती कार्यक्रमाला आली होती. पापाराझींसमोर तिने पोज दिली. तिच्यासोबत मुलगा यशवर्धनही होता. तेवढ्यात पापाराझींनी अनेकदा तिला 'गोविंदा कुठे आहे?','सर कहा है' असे प्रश्न विचारले. यावर सुरुवातीला सुनिताने दुर्लक्ष केलं. नंतर जाताना पुन्हा पापाराझींनी गोविंदाचा प्रश्न विचारल्यावर सुनिता म्हणाली, "तुम्हालाच शोधत आहे".

सुनिता आहुजाच्या बिंधास्त अॅटिट्युडचं नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे. तसंच काही जणांनी तिला दुसरी राखी सावंतही म्हटलं आहे. 'गोविंदामुळेच लोक तुला ओळखतात एवढी उडू नको' अशीही कमेंट काहींनी केली आहे. गोविंदा आणि सुनिता आहुजा यांनी १९८७ सालीच लग्न केलं. त्यांना टीना आणि यशवर्धन ही मुलं आहेत.

टॅग्स :गोविंदासोशल मीडिया