Join us
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: गोविंदाने लेकीसोबत केला दमदार डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2021 14:54 IST

गोविंदाने नुकताच त्याचा डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

बॉलिवूडचा हिरो नंबर वन अभिनेता गोविंदा सध्या सिनेइंडस्ट्रीपासून भलेही दूर आहे पण सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे आणि चाहत्यांना एण्टरटेन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गोविंदा अभिनयासोबत डान्स आणि कॉमेडीसाठी प्रसिद्ध आहे. संपूर्ण जगात खूप चाहते आहेत जे त्याच्या पोस्टची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. गोविंदाने यादरम्यान डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो लेक नर्मदा आहुजासोबत डान्स करताना दिसतो आहे.

सध्या रूपेरी पडद्यापासून दूर असलेल्या गोविंदाने त्याच्या मुलीसोबत डान्स करताना एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याच्या मुलीचे नाव टिना आहुजा असे आहे. बाप-लेकीचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतो आहे. 

गोविंदाने १९८०च्या दशकात एक्शन आणि डान्सिंग हिरोच्या रुपात करिअरची सुरूवात केली. ९०च्या दशकात तो विनोदी अभिनेता म्हणून नावारुपास आला. 

त्याच्या इल्जाम, हत्या, जीते है शान से आणि हम या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर खूप लोकप्रियता मिळवली होती. १९९२ साली रिलीज झालेला रोमँटिक चित्रपट शोला और शबनममध्ये युवा एनसीसी कॅडेटची भूमिका केली होती. त्याच्या या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. गोविंदा सध्या सिनेइंडस्ट्रीपासून दूर आहे. पण व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन करत असते.

टॅग्स :गोविंदा