Join us
Daily Top 2Weekly Top 5

३ महिन्यांतच लेकीला गमावलं! गोविंदाच्या पत्नीचा खुलासा, म्हणाली- "तिच्या फुप्फुसात..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 10:03 IST

३ महिन्यांतच झालं होतं गोविंदाच्या लेकीचं निधन, इतक्या वर्षांनंतर अभिनेत्याच्या पत्नीचा खुलासा, म्हणाली- "तिच्या फुप्फुसात..."

अभिनय आणि डान्सिंग स्टाइलने ९०चं दशक गाजवत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे गोविंदा. राजा बाबू, बडे मिया छोटे मिया, नसीब, स्वर्ग, कुली नं १, हिरो नं १, सँडविच अशा अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम करून त्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. बॉलिवूडमधील करिअरबरोबरच गोविंदा त्याच्या पर्सनल आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असतो. 

अभिनयातील करिअरबरोबरच त्याने पर्सनल आयुष्यातही अनेक चढ उतार पाहिले. गोविंदाच्या लेकीचं तीनच महिन्यात निधन झालं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याची पत्नी सुनिता यांनी याबाबत खुलासा केला. सुनीता यांनी टाइमआऊट विथ अंकित या पॉडकास्टला हजेरी लावली होती. या पॉडकास्टमध्ये सुनीता यांनी त्या कठीण काळाबद्दल भाष्य केलं. गोंविदा आणि सुनीता यांना टीना आणि यश ही दोन मुलं आहेत.  टीनानंतर सुनीता यांनी एका मुलीला जन्म दिला होता. पण, तिचं अवघ्या काही महिन्यांतच निधन झालं. 

सुनीता म्हणाल्या, "यश खूप लाडात वाढला आहे. तो टीनापेक्षा आठ वर्षांनी लहान आहे. यशच्या आधी मी आणखी एका मुलीला जन्म दिला होता. पण, तिने नऊ महिने पूर्ण होण्याआधीच जन्म घेतला होता. आणि त्यानंतर जास्त दिवस ती जगू शकली नाही. तीन महिन्यांची असतानाच तिचं निधन झालं. तिचं फुप्फुस कमजोर होतं. मुलीच्या निधनानंतर मी खूप घाबरले होते. त्यामुळेच मी यशला खूप काळजी घेऊन मोठं केलं. तो घरातील सगळ्यात लाडावलेला मुलगा आहे. मला त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत. मी माझ्या दोन्ही मुलांबरोबर थोडं कठोर वागते. पण, आता माझी मुलं मोठी झाली आहेत".

टॅग्स :गोविंदासेलिब्रिटी