Join us  

चित्रपटगृहांमध्ये पुन्हा 'पुष्पाराज'; अल्लू अर्जुनच्या 'Pushpa 2' च्या चित्रीकरणाला होणार सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 5:03 PM

pushpa the rule: 'पुष्पा द राइज'च्या उदंड यशानंतर त्याच्या सिक्वलमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना एक नवीन कथानक पाहायला मिळणार आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जून (allu arjun) याचा पुष्पा (puspa) हा चित्रपट प्रदर्शित होऊन बरेच दिवस झाले मात्र त्याची क्रेझ अद्यापही कमी झालेली नाही. अजूनही प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची चर्चा रंगतांना दिसते. जवळपास १०० कोटींपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन सुकुमार यांनी केलं. विशेष म्हणजे उत्तम कथानकामुळे लोकप्रिय ठरलेल्या या चित्रपटाच्या सिक्वलची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटाचा पुढील भाग कधी प्रदर्शित होणार हा एक प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. मात्र, प्रेक्षकांना आता या चित्रपटासाठी फार काळ वाट पाहावी लागणार नाही. कारण, लवकरच 'पुष्पा 2 'च्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील महिन्यात म्हणजेच जुलैमध्ये 'पुष्पा: द रुल' च्या चित्री'करणाला सुरुवात होणार आहे.  पुष्पाच्या या नव्या सिक्वलचं दिग्दर्शनदेखील सुकुमारच करणार आहेत. तसंच या चित्रपटाचं बजेटदेखील ठरवण्यात आलं आहे.

'पुष्पा द राइज'च्या उदंड यशानंतर त्याच्या सिक्वलमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना एक नवीन कथानक पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची कथा स्वत: सुकुमार यांनीच लिहिली आहे. या नव्या भागात प्रेक्षकांना अनेक रंजक गोष्टी पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, 'पुष्पा: द रुल' मध्ये दाक्षिणात्य कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकार झळकणार असल्याचं सांगण्यात येतं. या चित्रपटाचं जुलै महिन्याच्या शेवटी चित्रीकरण सुरु होणार असल्याचं म्हटलं जात असलं तरीदेखील अद्यापही या शुटिंगचं कोणतंही शेड्युल समोर आलेलं नाही. त्यामुळे या चित्रपटात कोणते कलाकार झळकणार?, नेमकं कथानक काय असेल?, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख काय? असे कितीतरी प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत.

टॅग्स :पुष्पाTollywoodअल्लू अर्जुनरश्मिका मंदाना