Join us

लहानपण देगा देवा...!! मधुराणी प्रभुलकरनं शेअर केला सेटवरचा छोट्या जानकीसोबतचा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 18:00 IST

Madhurani Prabhulkar : अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने सोशल मीडियावर छोट्या जानकीचा सेटवरील व्हिडीओ शेअर केला आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते'(Aai Kuthe Kay Karte)ने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील ट्विस्ट आणि टर्न्समुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. या मालिकेतील पात्रेही घराघरात पोहचले आहेत. यात मुख्य भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) हिने साकारली आहे. ती सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. दरम्यान आता तिने सोशल मीडियावर मालिकेतील छोटी जानकीचा सेटवरील व्हिडीओ शेअर केला आहे. 

मधुराणी प्रभुलकर हिने इंस्टाग्रामवर छोट्या जानकीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत जानकी माइक हातात घेऊन त्यात गुणगुणताना दिसत आहे. तिने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, आमची ही छोटी जानकी...! बरं गंमत म्हणजे हिचं खरं नावही जानकीच आहे बरं का ! ही सेटवर आली की सारं वातावरण बदलून जातं... एक जिवंतपणा येतो संपूर्ण युनिटला... सगळेच तिच्या बाललीलांमध्ये रमून जातात... आज आम्ही माईकच्या प्रेमात आहोत आणि माईकवरून आम्हला गायचंय...! लहानपण देगा देवा....!!!!

मधुराणी प्रभुलकरच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे. नेटकरी छोट्या जानकीचं कौतुक करत आहेत. एका युजरने लिहिले की, किती गोड आहात दोघीही. दुसऱ्या युजरने लिहिले की, सो स्वीट. 

प्रेक्षक झाले नाराजआई कुठे काय करते या मालिकेत आलेल्या वळणामुळे प्रेक्षक चांगलेच हादरले आहेत. आशुतोषचा अपघाती मृत्यू झालेला दाखवल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. या मालिकेत आता तरी अरुंधतीच्या आयुष्यात कुठेतरी स्थैर्य येईल आणि ती सुखी होईल असे सगळ्यांना वाटत होते. पण, अचानक आशुतोषचा मृत्यू दाखवल्याने प्रेक्षक नाराज झाले आहेत.

टॅग्स :मधुराणी प्रभुलकरआई कुठे काय करते मालिका