Join us

लग्नापूर्वी दिसली नताशाच्या वेडिंग लेहंग्याची झलक, अलिबागसाठी रवाना झाली धवन फॅमिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2021 16:56 IST

अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्याकडे २२ जानेवारीपासून लग्नाच्या तयारीची लगबग सुरु झाली आहे.

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्याकडे लगीनघाई सुरू झाली आहे. २२ जानेवारीपासून लग्नाच्या तयारीची लगबग सुरु झाली आहे. दरम्यान, वरुणच्या वधूचा अर्थात नताशाच्या लेहंग्याचा फोटो समोर आला आहे. या इव्हेंट टीमचे सदस्य काल संध्याकाळी वेडिंग आऊटफिट्ससह नताशाच्या घरी पोहोचले होते. लेहंग्याच्या पाहिल्या झलकवरून असे दिसते आहे की, नताशाने तिच्या लग्नासाठी पेस्टल शेड निवडली आहे. फोटोमध्ये आपल्याला दिसेल की या लेहेंग्यावर बीड्स आणि डायमंडचे वर्क केले आहे. या आऊटफिटमध्ये नताशा खूपच सुंदर दिसणार आहे .

तर दुसरीकडे, लग्नाच्या स्थळाचीही सजावट केली जात आहे.तिथले फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. वरुण-नताशाचे लग्न अलीबागच्या द मेन्शनमध्ये पार पडणार आहे. समुद्राच्या अगदी जवळ असलेल्या या भल्या मोठ्या मेन्शनमध्ये हा सोहळा पार पडणार आहे.

वरुण धवन आणि नताशा दलाल आज आपल्या कुटूंबियांसह अलिबागला रवाना झाले आहेत. अलिबागमधील बरेच व्हिला पाहुण्यांसाठी बुक करण्यात आले आहेत. आजपासून २४ जानेवारीपर्यंत लग्नाच्या विधी सुरू असतील.

वरुण आणि नताशाच्या लग्नाच्या कार्यक्रमांची सुरुवात संगीत सोहळ्याने होईल. वरुणचे बॉलिवूडमधील मित्र करण जोहर, मनीष मल्होत्रा, सारा अली खान, अर्जुन कपूर-मलाइका अरोरा, जाह्नवी कपूर-खुशी कपूर, कतरिना कैफ, नीतू कपूर, कियारा अडवाणी, करण जोहर, अनिल कपूर, रिया कपूर आणि हर्षवर्धन कपूर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. डेविड धवन आणि सलमान खान यांच्यात खूप चांगली मैत्री आहे. त्यामुळे सलमान खानही या लग्नात उपस्थिती लावणार आहे. 

टॅग्स :वरूण धवननताशा दलाल