Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मै छमछम नाचूंगी", भर पावसात चिंब भिजून साडीवर गौतमी पाटीलचा डान्स, व्हिडिओ पाहून चाहते फिदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 11:35 IST

आताही गौतमीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक रील व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत गौतमी भर पावसात डान्स करताना दिसत आहे.

प्रसिद्ध लावणी डान्सर गौतमी पाटील तिच्या अदांनी चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते. गौतमीच्या कार्यक्रमांनाही चाहते प्रचंड गर्दी करताना दिसतात. गौतमी तिच्या डान्सने चाहत्यांची मनं जिंकून घेते. गौतमी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेक ट्रेंडिंग गाण्यावरही ती रील व्हिडिओ बनवते. 

आताही गौतमीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक रील व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत गौतमी भर पावसात डान्स करताना दिसत आहे. भर पावसात गौतमीने साडी नेसून डान्स केला आहे. ती पावसात चिंब भिजल्याचंही दिसत आहे. 'छमछम नाचूंगी' या गाण्यावर गौतमीने रील व्हिडिओ बनवला आहे. गौतमीने शेअर केलेला हा रील व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

गौतमीने काही सिनेमांमध्येही आयटम साँग केले आहेत. काही अल्बम साँगमध्येही ती दिसली होती. गौतमी सार्वजनिक कार्यक्रमांनाही हजेरी लावताना दिसते. स्टार प्रवाह वाहिनीवरील होऊ दे धिंगाणामध्येही ती सहभागी झाली होती. आता शिट्टी वाजली रे या कुकिंग रिएलिटी शोमधून गौतमी प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. 

टॅग्स :गौतमी पाटीलसेलिब्रिटी