Join us  

'रोहित शेट्टी मला हाकलून लावतील', असं का म्हणाला मराठमोळा गश्मीर महाजनी ?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 12:32 PM

प्रसिद्ध अभिनेता म्हणून गश्मीर याला चाहत्यांकडून प्रेम मिळतं.

अभिनेता गश्मीर महाजनी याने स्वतःला फक्त मराठी इंडस्ड्रीपर्यंत मर्यादित न ठेवता बॉलिवूडमध्ये देखील अनेक प्रोजेक्टमध्ये काम केलं आहे. मराठी कलाविश्वातील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेता म्हणून गश्मीर याला चाहत्यांकडून प्रेम मिळतं. आता 'खतरों के खिलाडी १४'मध्ये मराठमोळा गश्मीर महाजनी दिसणार आहे. 

प्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी' कार्यक्रमाच्या १४व्या पर्वात मराठमोळा चेहरा सहभागी झाला आहे. गश्मीरला 'खतरों के खिलाडी' मध्ये स्टंट करताना पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.  स्टंटवर आधारित असलेला ‘खतरों के खिलाडी’चं १४वं पर्व लवकरच सुरू होणार आहे.  शुटिंगसाठी एक खास ठिकाण निवडण्यात आलं आहे. इतर स्पर्धकांसोबत 'खतरों के खिलाडी १४'साठी गश्मीर लवकरच रोमानियाला रवाना होणार आहे.

दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्याकडे चित्रपटात संधी मागणार का? यावर दैनिक जागरणशी बोलताना गश्मीर म्हणाला, 'मला वाटते काम मागण्याची वेळ आणि ठिकाण असते. जर तुम्ही सगळीकडे म्हणालं की, मला काम द्या, मला काम द्या, तर ते मला हाकलून लावतील. असं नाही की त्यांची आणि माझी ही पहिली भेट आहे. याआधीही मी त्यांना भेटलो आहे. पण, या शोच्या सेटवर मी त्यांच्याशी चांगली ओळख करून घेईन. मला स्टंटबद्दल अधिक माहिती मिळेल. मला खूप काही शिकायला मिळेल जे भविष्यात उपयुक्त ठरेल'.

गश्मीर महाजनी जेव्हा झलक दिखला जामध्ये सहभागी झाला होता. तेव्हाच रोहित शेट्टीने त्यावा 'खतरो के खिलाडी' शोसाठी ऑफर दिली होती. परंतु, तेव्हा गश्मीरला या शोमध्ये सहभागी होता आलं नव्हतं. त्यामुळे आता पुन्हा त्याला या रिएलिटी शोसाठी विचारणा झाली आहे. 'खतरों के खिलाडी' सिझ 'रोहित शेट्टी मला हाकलून लावले',  असं का म्हणाला मराठमोळा गश्मीर महाजनी ?न 13 चं शुटिंग हे दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये झालं होतं. 'खतरों के खिलाडी 14' हा खास असणार आहे. या सीझनमध्ये सर्व स्पर्धक  'खतरों के खिलाडी 14' च्या ट्रॉफीसाठी खतरनाक स्टंट करणार आहेत.  

टॅग्स :गश्मिर महाजनीसेलिब्रिटीटेलिव्हिजनरोहित शेट्टी