Join us
Daily Top 2Weekly Top 5

'कचरा तर तुझ्या तोंडातून पडला'; 'त्या' तरुणाचा अनुष्का शर्मावर पलटवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 21:29 IST

हे सर्व शूट करून सोशल मीडियावर पोस्ट करण्याच्या विराट कोहलीच्या भंगार मनोवृत्तीचे काय?

मुंबई: गाडीतून रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या एका व्यक्तीला फैलावर घेतानाचा अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचा व्हीडिओ सोशल मीडियावर नुकताच व्हायरल झाला होता. अनुष्काचा पती विराट कोहली याने हा व्हीडिओ शूट करून ट्विटरवर शेअर केला होता. या व्हीडिओत अनुष्का शर्मा रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या तरूणाला जाब विचारताना दिसत होती. यावेळी रागाच्या भरात अनुष्काने या तरुणाला चांगलेच फैलावर घेतले होते. त्यावेळी हे प्रकरण फार पुढे न गेल्यामुळे हा तरूण कोण होता, याचा उलगडा झाला नव्हता.

रस्त्यावर कचरा टाकणाऱ्याला अनुष्काने विचारला जाब, विराटने शेअर केला व्हिडीओमात्र, शनिवारी या तरूणाने स्वत:हून फेसबुकवर पोस्ट टाकून अनुष्का शर्मा हिच्यावर पलटवार केला. या तरुणाचे नाव अरहान सिंग असे आहे. अरहानने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये अनुष्काने वापरलेल्या भाषेबद्दल तीव्र आक्षेप घेतला आहे. मी रस्त्यावर टाकलेल्या कचऱ्यापेक्षा जास्त कचरा तर अनुष्का शर्माच्या तोंडातून पडला, अशा शब्दांत अरहानने आपला संताप व्यक्त केला. अरहानने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, तो प्रसंग भयंकर होता. मी निष्काळजीपणे प्लॅस्टिकचा छोटासा तुकडा रस्त्यावर टाकला. त्याचवेळी माझ्या शेजारून जाणाऱ्या कारची खिडकी उघडली गेली. त्यामध्ये आपल्या अनुष्का शर्मा होत्या. रस्त्यावर राहणाऱ्या लोकांप्रमाणे त्या माझ्यावर ओरडत होत्या, किंचाळत होत्या. मी माझ्या कृतीबद्दल क्षमस्व आहे. परंतु, श्रीमती अनुष्का शर्मा यांनी थोडी सभ्यता आणि नम्र भाषेत मला हे सर्व सांगितले असते तर त्यांना कमीपणा आला नसता. मी तर चुकून रस्त्यावर कचरा टाकला. मात्र, तुमच्या तोंडातून जो कचरा बाहेर पडला त्याचे काय? तसेच हे सर्व शूट करून सोशल मीडियावर पोस्ट करण्याच्या विराट कोहलीच्या भंगार मनोवृत्तीचे काय, असा सवाल अरहानने अनुष्काला विचारला आहे. त्यामुळे आता अनुष्का शर्मा किंवा विराट कोहली याला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहलीसोशल मीडिया