Join us
Daily Top 2Weekly Top 5

महिमा गुप्ताने सोशल मीडियावर लावली आग, पुन्हा घातलाय धुमाकुळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 11:21 IST

एकता कपूरची वेब सिरीज 'गंदी बात'मध्ये महिमा गुप्ता मुख्य भूमिकेत झळकली होती. ट्रेलर पाहूनच महिमानेच सा-यांचे लक्ष वेधून घेतले होते. तसेच आपल्या हॉट आणि बोल्ड लूकमुळेही ती कायम चर्चेत असते.

सोशल मीडियावर महिमा गुप्ताने धुमाकुळ घातला आहे. सध्या तिचीच जास्त चर्चा होत आहे. महिमा गुप्ता फारशी परिचयाची नसली तरी सोशल मीडियावर मात्र तिच्या फॉलोअर्सची संख्या पाहून ती डिजीटल माध्यमात तुफान लोकप्रिय असल्याचे पाहायला मिळते. एकता कपूरची वेब सिरीज 'गंदी बात'मध्ये महिमा गुप्ता मुख्य भूमिकेत झळकली होती. ट्रेलर पाहूनच महिमानेच सा-यांचे लक्ष वेधून घेतले होते. तसेच आपल्या हॉट आणि बोल्ड लूकमुळेही ती कायम चर्चेत असते. तुर्तास तिचे  सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून  महिमा नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपली भूमिका, आगामी प्रोजेक्टस  यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. 

मुळात सोशल मीडियावर  तिच्या करिअरपेक्षा खाजगी कारणांमुळेच  जास्त चर्चेत असते. तिच्या सोशलम मीडिया अकाऊंटवर नजर टाकली तर तुम्हाला विविध अंदाजातील फोटो पाहून अंदाज येईलच. नुकतेच तिने तिच्या बॉयफ्रेंडविषयीचा एक किस्सा शेअर केला होता. हा किस्सा शेअर करत अनेकांनी आश्चर्याचा धक्काच बसला होता. कारण हा किस्सा असा जाहीररित्या जगासमोर मांडणेही अनेकांना रुचलेले नाही.

तसेच तिच्याविषयीही तिने अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. यात तिने म्हटले आहे की,माझा एटीट्युड पाहून तुम्ही मी एक व्यक्ती म्हणून कशी असेल याचा अंदाज लावत असाल तर मी तशी आहे जसे तुम्ही मला पाहणे पसंत करता. मी ९९% अनेकांसाठी एंजल असेल पण १ % साठी मी काय असेल ? अशाच काही गोष्टी करत ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असते. 

टॅग्स :एकता कपूर