Join us

करिअरमध्ये पहिल्यांदाच सुबोध भावेने केले पहिल्यांदाच हे काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 07:15 IST

मराठी रंगभूमीचे पहिले सुपरस्टार नटश्रेष्ठ डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्यावर आधारीत चित्रपटात घाणेकर यांच्या भूमिकेत अभिनेता सुबोध दिसणार आहे. ही भूमिका वास्तविक वाटण्यासाठी तो खूप मेहनत घेतो आहे.

ठळक मुद्देसुबोध भावे दिसणार डॉ. काशिनाथ घाणेकरांच्या भूमिकेत घाणेकरांच्या भूमिकेसाठी सुबोध घेतोय खूप मेहनत 'आणि...काशिनाथ घाणेकर' ७ नोव्हेंबर रोजी होणार प्रदर्शित

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सुबोध भावेने विविध भूमिका सक्षमपणे साकारून प्रेेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. सध्या तो छोट्या पडद्यावरील मालिका तुला पाहते रेमध्ये विक्रांत सरंजामेची भूमिका साकारत आहे. ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरते आहे. तसेच मराठी रंगभूमीचे पहिले सुपरस्टार नटश्रेष्ठ डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्यावर आधारीत चित्रपटात घाणेकर यांच्या भूमिकेत अभिनेता सुबोध दिसणार आहे. ही भूमिका वास्तविक वाटण्यासाठी तो खूप मेहनत घेतो आहे. त्याने यासाठी डोळ्यांना लेन्स लावली आहे. याबाबत खुद्द त्याने स्वतः सोशल मीडियावर सांगितले आहे. 

सुबोध भावेने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करून लिहिले की,'मला लेन्स लावायची खूप भीती वाटायची. मी कधीच लेन्स वापरली नव्हती. मात्र माझा आगामी चित्रपट 'आणि... काशिनाथ घाणेकर' सिनेमातील घाणेकरांच्या भूमिकेसाठी लेन्स वापरावी लागली. कारण त्यांच्या डोळ्याचे वेगळेपण जपणे महत्त्वाचे होते आणि मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांच्या सल्ल्याने मी लेन्स वापरण्याचा निर्णय घेतला. या भूमिकेच्या निमित्ताने मी पहिल्यांदा लेन्स वापरली.'

काशिनाथ घाणेकर यांनी मराठी रंगभूमीचा चेहेरामोहरा नाट्यमयरीत्या बदलून टाकला होता. मराठीतील सुपरस्टार आणि महान रंगकर्मी डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा विलक्षण प्रवास 'आणि...काशिनाथ घाणेकर' या सिनेमाद्वारे रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात सुबोध भावेसोबत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, सुमित राघवन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा ७ नोव्हेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. सुबोध भावे काशिनाथ घाणेकर यांच्या भूमिकेतून प्रेक्षकांना भुरळ पाडेल का, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

टॅग्स :सुबोध भावे