Join us
Daily Top 2Weekly Top 5

कंगना रानौतच्या 'मणिकर्णिका' चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 13:10 IST

'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी' हा सिनेमा झाशीच्या राणीच्या जीवनावर आधारीत असून यात झांशीच्या राणीच्या भूमिकेत अभिनेत्री कंगना रानौत दिसणार आहे.

ठळक मुद्दे'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी' हा सिनेमा झाशीच्या राणीच्या जीवनावर आधारीत आहे. कंगना राणावत दिसणार राणी लक्ष्मीबाईंच्या भूमिकेत

बॉलिवूडची क्वीन कंगना रानौतचा आगामी बहुचर्चित चित्रपट ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’चा पहिला पोस्टर स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रदर्शित करण्यात आला आहे. झांशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असून यात कंगना राणी लक्ष्मीबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे.

‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’च्या पोस्टरमध्ये मुलाला पाठीला बांधून रणांगणात इंग्रजांविरुद्ध उभ्या ठाकलेल्या मर्दानी झाशीच्या राणीचे हे रुप तिने देशासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण करून देणारे आहे. झी स्टुडिओची प्रमुख निर्मिती असलेला चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होत आहे. कंगनाचा या पोस्टरमधील लूक पाहून तिच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे.

 

'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी' हा सिनेमा झाशीच्या राणीच्या जीवनावर आधारीत आहे. कंगना राणावत ही राणी लक्ष्मीबाईंच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी कंगनाने खास तलवारबाजीचे धडेही गिरवले आहेत. तसेच ती या चित्रपटात अनेक स्टंट करताना दिसणार आहे. निर्मात्याला विश्वास आहे की प्रेक्षकांना ही सीन्स खूप आवडतील आणि प्रेक्षकांच्या नजरा कंगानवरुन हलणे अशक्य आहे. छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अंकिता लोखंडे या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. तिच्याबरोबर अतुल कुलकर्णी एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. २५ जानेवारी २०१९ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कंगनाला ऐतिहासिक सिनेमात झाशीच्या राणी यांच्या भूमिकेत पाहणे कमालीचे ठरणार आहे.

टॅग्स :माणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसीकंगना राणौत