‘पीके’ या आगामी चित्रपटातील ‘त्या’ नग्न पोस्टरवरून आमिर टीकेचा धनी बनला आहे; परंतु आमिरला मात्र त्यात काही अश्लील असल्याचे वाटत नाही. ‘चित्रपटातील गरज असल्यानेच ते नग्न दृश्य चित्रित करण्यात आले. त्यात काही अश्लील नसल्याची खात्री प्रेक्षकांना चित्रपट बघितल्यानंतर पटेल’ असे आमिरने सांगितले. माझे आतापर्यंतचे सर्व चित्रपट एकीकडे, तर ‘पीके’ दुसरीकडे, एवढी प्रचंड मेहनत मी या चित्रपटावर घेतली असल्याचेही त्याने स्पष्ट केले. दरम्यान, ‘पीके’ चित्रपटातील आमिरच्या अश्लील पोस्टरचा वाद आता संसदेतही पोहोचला आहे. हे पोस्टर म्हणजे आमिरने प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट असून, सरकारने त्यावर तातडीने बंदी घालावी, अशी मागणी बहुजन समाज पक्षाचे खा. सतीशचंद्र मिश्रा यांनी केली आहे. या प्रकरणी आमिरविरुद्ध इंदूर आणि लखनौमध्येही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
‘ते’ दृश्य चित्रपटाची गरज : आमिर
By admin | Updated: August 18, 2014 04:55 IST
‘पीके’ या आगामी चित्रपटातील ‘त्या’ नग्न पोस्टरवरून आमिर टीकेचा धनी बनला आहे; परंतु आमिरला मात्र त्यात काही अश्लील असल्याचे वाटत नाही
‘ते’ दृश्य चित्रपटाची गरज : आमिर
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}