Join us

रेखाला कॅटच्या सौंदर्याची भीती

By admin | Updated: May 27, 2015 23:26 IST

दिग्दर्शक अभिषेक कपूरच्या आगामी ‘फितूर’ चित्रपटाच्या सेटवरून एक शॉकिंग बातमी आहे. जिच्या सौंदर्याचे दाखले आतापर्यंत बॉलीवूडमध्ये दिले जातात ती अभिनेत्री रेखा चक्क घाबरली आहे.

दिग्दर्शक अभिषेक कपूरच्या आगामी ‘फितूर’ चित्रपटाच्या सेटवरून एक शॉकिंग बातमी आहे. जिच्या सौंदर्याचे दाखले आतापर्यंत बॉलीवूडमध्ये दिले जातात ती अभिनेत्री रेखा चक्क घाबरली आहे. या भीतीचे कारण दुसरे-तिसरे काही नसून कतरिना कैफचे सौंदर्य आहे. त्याचे झाले असे की, रेखा आणि कॅटचा एक सीन शूट झाला. यानंतर रेखाने मॉनिटरमध्ये तो पाहिला असता कॅट तिच्यापेक्षा अधिक सुंदर दिसत असल्याने हा सीन कट करण्याची विनंती तिने दिग्दर्शकाला केली. मात्र अभिषेकने त्यास साफ नकार दिल्याने रेखाने हा चित्रपटच सोडून दिलाय म्हणे.