Join us  

हमसफर! माहिरा खानच्या संगीत सोहळ्यात दिसली फवाद खानची झलक, चाहते भावूक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 11:25 AM

'हमसफर' फेम माहिराच्या लग्नात सहकलाकार फवाद खानचीही उपस्थिती पाहून चाहत्यांची नजर हटत नाहीए.

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान (Mahira Khan) काही दिवसांपूर्वीच पुन्हा लग्नबंधनात अडकली. सलीम करीमसोबत तिचा निकाह पार पडला. त्यांच्या लग्नाचा सुंदर व्हिडिओ समोर आला. अगदी स्वप्नवत वाटावं असं त्यांचं वेडिंग लोकेशन होतं. दरम्यान संगित सोहळ्याचा व्हिडिओ अभिनेत्रीने नुकताच शेअर केला आहे. यामध्ये चक्क अभिनेता फवाद खानचीही (Fawad Khan) झलक दिसली. 'हमसफर' फेम माहिराच्या लग्नात सहकलाकार फवाद खानचीही उपस्थिती पाहून चाहत्यांची नजर हटत नाहीए.

'हमसफर' हा लोकप्रिय पाकिस्तानी ड्रामा आहे. ज्याचे चाहते भारतातही आहेत. या मालिकेतून माहिरा आणि फवादची केमिस्ट्री खूपच गाजली. त्यांची जोडी प्रेक्षकांना भलतीच आवडली. माहिराच्या संगीत सोहळ्यात फवादला पाहून चाहत्यांना हमसफर मालिकेचीच आठवण झाली. या व्हिडिओत संगीत सोहळ्याचं लोकेशनही खूप सुंदर आहे. सर्व पायऱ्यांवर बसले आहेत आणि लाईव्ह परफॉर्मन्स एन्जॉय करत आहेत. तेव्हाच सर्व पाहुण्यांमध्ये फवाद खानही बसलेला दिसत आहे. चाहत्यांची नजर बरोबर फवादवर गेली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

'आम्ही फवादला पाहिलं' असं म्हणत चाहते अक्षरश: भावूक झाले आहेत. फवाद आणि माहिराची जोडी त्यांच्या खूप जवळची आहे. 'हमसफर' मालिकेतील 'वो हमसफर जो...' हे गाणं आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतं. 

माहिरा खानबद्दल सांगायचं तर २००७ मध्ये अली अक्सारी सोबत तिचं लग्न झालं होतं. दोघंही अमेरिकेत भेटले होते. अली अक्सारी अभिनेता, निर्माता आहे. लग्नानंतर वयाच्या २४ व्या वर्षीच तिने मुलगा अजलानला जन्म दिला. मात्र काही कारणांमुळे २०१५ माहिरा आणि अलीचा त्यांचा घटस्फोट झाला. तर मुलाची कस्टडी माहिराला मिळाली. अनेक वर्षांनी माहिराला पुन्हा एकदा जोडीदार मिळाला आहे. सलीम करीम हा उद्योजक असून माहिरा आणि त्याची ओळख नक्की कुठे झाली हे समजू शकलेलं नाही. गेल्या अनेक वर्षांपासून दोघंही एकमेकांना डेट करत होते. अखेर आता ते लग्नबंधनात अडकले आहेत.

टॅग्स :माहिरा खानफवाद खानलग्नसंगीत