बॉलीवूड अभिनेत्री क्रि ती सॅनन ही लवकरच ‘राब्ता’ चित्रपटात दिसणार आहे. कंगणा राणावत, दीपिका पदुकोन व सोनम कपूर यांच्यासारख्या अभिनेत्रीकडून मी फॅशनची प्रेरणा घेतल्याचे क्रिती म्हणते. अनेक बॉलीवूड अभिनेत्रींनी मला प्रेरणा दिलेली आहे. दीपिकाचा मला कपडे परिधान करण्याचा अंदाज आवडतो. तर कंगणाचा लुक्सबरोबरच प्रयोग व फॅशन करण्याची पद्धत आवडते, तसेच सोनम कपूरचीही फॅशनची वेगळी शैली आहे. अभिनेत्रींमध्येही अनेक जण फॅशनेबल आहेत. विशेषत: मला शाहरुख खानची स्टाईल आवडत असल्याचीही क्रिती म्हणाली. दिनेश विजेन यांनी दिग्दर्शित केलेल्या राब्ता या चित्रपटात क्रिती सनॉन व सुशांत सिंग राजपूत प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी १० फेबु्रवारीला प्रदर्शित होत आहे.
दीपिका, कंगनाकडून घेतली क्रितीने फॅशनची प्रेरणा
By admin | Updated: September 26, 2016 01:43 IST