Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss Marathi 3 Upadate: जय दुधानेवर संतापले चाहते,घरातून बाहेर काढण्याची होते मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 14:24 IST

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरू आहे कॅप्टन्सी कार्य. ज्यामध्ये कॅप्टन पदाचे उमेदवार जय आणि विशाल यांना समर्थन देण्यासाठी काही गोष्टी गमवण्यास सदस्य तयार झाले.

दिवसेंदिवस बिग बॉस मराठी ३ हा सिझन सध्या खूप गाजत आहे. सगळीकडेच या शोची चर्चा ऐकायला मिळते.घरातले स्पर्धकही घरात टिकून राहण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करताना पाहायला मिळतात. कधी कधी अतिउत्साहाच्या भरात स्पर्धक असेकाही करुन जातात की, त्या गोष्टीमुळे त्यांना चाहत्यांच्या टिकेला सामोरे जावे लागते. असेच काहीसे घडले आहे जय दुधानेसोबत. सोशल मीडियावर जय दुधानेला प्रचंड ट्रोल केले जात आहे. त्याच्याविरोधी नेटीझन्स संताप व्यक्त करताना दिसत आहे. जयवर नेटीझन्सने निशाणा साधल्याचे कारणही तसेच आहे. आधीच्या भागात जय दुधानेचे घरातल्या स्पर्धकांबरोबर अनेकदा खटके उडाल्याचे पाहायला मिळाले होते. 

कधी टॉवेलवरुन तर कधी स्नेहा वाघसोबतच्या वाढणारी जवळीकमुळे जय अनेकांना खटकायचा.इतकंच काय तर जय घरात अनेकदा शर्टलेसच राहायचा. त्याचं घरात असं वागणं इतर स्पर्धकांनाही आवडायचे नाही. स्पर्धकांनी त्याला अनेकदा समजावूनही सांगितले होते.पण तरीही त्याच्या वागण्यात काही फरक पडला नाही. रसिकही त्याच्या या गोष्टींचा संताप व्यक्त करताना दिसत आहेत. त्याच्यावर रसिक चांगलेच भडकले असून सोशल मीडियावर त्याच्याविरोधात तीव्र टीका करण्यात येत आहे. 

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरू आहे कॅप्टन्सी कार्य. ज्यामध्ये कॅप्टन पदाचे उमेदवार जय आणि विशाल यांना समर्थन देण्यासाठी काही गोष्टी गमवण्यास सदस्य तयार झाले. उत्कर्ष, मीरा, गायत्री आणि दादूस यांनी जयला समर्थन दिले तर, मीनल, विकास, सोनाली आणि नीथा यांनी विशालला समर्थन दिले. आज स्नेहा कोणाला समर्थन देणार यावर आधारित आहे कोण बनणार घराचा नवा कॅप्टन विशाल की जय. विशाल स्नेहाला सांगताना दिसणार आहे, “स्नेहा मी मानतो तर इथून मानतो, आधीसुध्दा मी होतो तुमच्याबरोबर आणि इथून पुढे देखील कायम राहीन. माझं प्रेम असंच आहे. विशाल तुम्ही मनं जिंकलं आहे. बिग बॉस मी समर्थन देते... बघूया स्नेहा कोणाला समर्थन देणार.आगामी भाग अधिक रंजक असणार हे मात्र नक्की.

टॅग्स :बिग बॉस मराठी