Join us
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता, माधव देवचकेला भेटण्यासाठी चाहती आली थेट कुवेत वरून !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 10:40 IST

माधवने 'सरस्वती' या मालिकेत त्याने साकारलेल्या कान्हा या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. 'हमारी देवरानी', 'बीन बनुंगा घोडी चढुंगा' या मालिकांमधील त्यांच्या भूमिकेचे कौतुक झाले होते.

मराठमोळा अभिनेता माधव देवचकेने छोट्या पडद्यावर दमदार एंट्री करत रसिकांचे तुफान मनोरंजन केले. मराठीतच नाहीतर त्याने हिंदी टीव्ही मालिकांमध्येही काम करत रसिकांची पसंती मिळवली आहे. माधवने 'सरस्वती' या मालिकेत त्याने साकारलेल्या कान्हा या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. 'हमारी देवरानी', 'बीन बनुंगा घोडी चढुंगा' या मालिकांमधील त्यांच्या भूमिकेचे कौतुक झाले होते.

सध्या विविध सेलिब्रिटी मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सशी कनेक्ट आहेत. ट्विटर,फेसबुक, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून फॅन्स सेलिब्रिटींशी संवाद साधत असतात. अभिनेता माधव देवचकेचेही ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टावर अनेक फॅन्स आहेत. मात्र या सगळ्या फॅन्सपैकी एक फॅन त्याच्यासाठी ख-या अर्थाने जबरा फॅन ठरला आहे. काही दिवसांपूर्वी त्याची एक चाहती थेट कुवेतवरून त्याला भेटायला भारतात आली होती. प्रियंका जोशी असे या चाहतीचे नाव आहे. आपल्या चाहतीला भेटून माधवही भारावून गेला. 

चाहत्यांचे प्रेम पाहून आणखीन जबाबदारीने काम केले पाहिजे याची जाणीव असल्याचे त्याने म्हटले आहे. यावरूनच त्याचे देशातच नाही तर परदेशातही त्याची लोकप्रियता तुफान असल्याचे स्पष्ट होते.

टॅग्स :माधव देवचक्के