Join us

छोट्या पडद्यावरील ही प्रसिद्ध अभिनेत्री लवकरच करणार डिजिटल डेब्यू, स्टायलिश फोटोंमुळे असते चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 16:37 IST

तिने 'कभी तो होगा' या टीव्ही मालिकेद्वारे टीव्ही जगतात पदार्पण केले.

आमना शरीफने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर चाहत्यांचा मनात आपलं स्थान निर्माण केले आहे. करिअरच्या सुरुवातील अभिनेत्री आमना शरीफने अनेक नामांकित ब्रँडसाठी मॉडेलिंग केलं आहे. छोट्या पडद्यावरील अभिनेत्री आमना शेरीफ आता 'डिमांड ३' या वेब सिरीजद्वारे डिजिटल जगात आपले नशीब आजमावणार आहे.  या वेबसीरिजचे पहिले दोन सीझन बरीच हिट ठरले असून यात अमृता खानविलकर मुख्य भूमिकेत होती आता तिसऱ्या सिजनसाठी आमना शेरीफची निवड करण्यात आलेली आहे.

साइकोलॉजिकल क्राइम ड्रामामध्ये काम करण्यासाठी आमना बरीच उत्साही आहे. ती नेहमीच छोट्या पडद्यावर सक्रिय राहिली आणि आता 'डिमांड 3' सीझनद्वारे डिजिटल माध्यमात डेब्यू करणार आहे. आमना शरीफने 'कभी तो होगा' या टीव्ही मालिकेद्वारे टीव्ही जगतात पदार्पण केले. अभिनेत्री आमनाने बॉलिवूडमध्ये 'एक खलनायक' आणि 'आलो चाट' सारखे चित्रपटांमध्ये केले आहे. 

 पहिल्यांदाच ती ओटीटी प्लॅटफॉर्म वर झळकणार आहे ज्यामध्ये ती अगदी वेगळ्या स्टाईलमध्ये दिसणार आहे. आमना सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते. आमना लग्न झाल्यानंतर अनेक वर्षं अभिनयक्षेत्रापासून दूर होती. तिने कसौटी जिंदगी की २ या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर कमबॅक केला. 

टॅग्स :कसौटी जिंदगी की 2