Join us  

आर्थिक संकटात सापडलीय ही प्रसिद्ध गायिका, सोशल मीडियावर व्यक्त केले दुःख

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 5:23 PM

कोरोनामुळे सामान्य जनताच नाही तर सेलिब्रेटींनाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो आहे.

देशभरात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. या महामारीत अनेकजण बेरोजगार झाले आहेत. कोरोनामुळे सामान्य जनताच नाही तर सेलिब्रेटींनाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो आहे. अशीच काही नामुष्की प्रसिद्ध गायिका सोना मोहपात्रावर ओढवली आहे. तिने सोशल मीडियावर तिच्या आर्थिक परिस्थितीबद्दल सांगितले आहे. ती म्हणाली की, माझे जमा असलेले सर्व पैसे चित्रपटासाठी खर्च झाले आहेत. कोरोनामुळे ही सर्व परिस्थिती ओढावली आहे. 

गायिका सोना मोहापात्राने एक सेल्फी शेअर करत लिहिले की, 'संकटातून पळवाट काढता येत नाही, पण दुःखी राहायचे की आनंदी हे तुमच्यावर अवलंबून आहे. माझा चित्रपट #ShutUpSona आजही सर्व जगात प्रवास करत आहे. फेस्टिव्हल जिंकत आहे.'

तिने पुढे सांगितले की. 'मी केलेली सर्व बचत या चित्रपटावर खर्च झाली आहे. कोरोनाने आपल्याला अशा ठिकाणी पोहोचवले आहे. ज्या ठिकाणी उत्पन्नाचा कोणत्याही प्रकारचा मार्ग नाही.' तिच्या  या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोना मोहापात्राची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

सोना मोहापात्रा स्त्रीवादापासून सामाजिक मुद्द्यांवर आपले मत सोशल मीडियावर व्यक्त करत असते. त्यामुळे बऱ्याचदा तिला ट्रोल केले जाते. मात्र ती ट्रोलर्सनाही चांगलेच खडेबोल लगावत असते. त्यामुळे ती बऱ्याचदा चर्चेत येत असते. 

मागील वर्षी सोनाने हेदेखील म्हटले होते की, सलमान खानच्या विरोधात बोलल्यामुळे तिला गँगरेपसोबत अॅसिड हल्ल्याची धमकी दिली होती.

टॅग्स :सोना मोहपात्राकोरोना वायरस बातम्या