Join us

Exclusive Bigg Boss 12 : ही आहे बिग बॉसची पहिली जोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 15:26 IST

कलर्स वाहिनीवरील लोकप्रिय हिंदी रिएलिटी शो बिग बॉसच्या बाराव्या सीझनचे अनावरण गोव्यात नुकतेच पार पडले. या सीझनच्या बारा जोडींपैकी पहिली जोडी आहे कॉमेडियन भारती सिंग व तिचा पती हर्ष लिंबाचिया.

ठळक मुद्देआतापर्यंत जास्त काळ टिकलेले रिलेशनशीप हे बिग बॉससोबतचे - सलमान खानपहिली जोडी कॉमेडियन भारती सिंग व तिचा पती हर्ष लिंबाचिया

कलर्स वाहिनीवरील लोकप्रिय हिंदी रिएलिटी शो बिग बॉसच्या बाराव्या सीझनचे अनावरण गोव्यात नुकतेच पार पडले. यावेळी सलमान खान अल्ला दुहाई, जीने के है चार दिन व जुम्मे की रात है यांसारख्या गाण्यांवर थिरकला. या सीझनच्या बारा जोडींपैकी पहिली जोडी आहे कॉमेडियन भारती सिंग व तिचा पती हर्ष लिंबाचिया. सलमानने त्यांच्या नावाची घोषणा या कार्यक्रमात केली. पहिल्यांदाच सलमान खान स्पर्धकांची नावे जाहीर करत आहे.सलमान खानने आतापर्यंत जास्त काळ टिकलेले रिलेशनशीप हे बिग बॉससोबतचे असल्याचे म्हटले व पुढे म्हणाला की, खरेतर बिग बॉसच्या सूत्रसंचालनासाठी शाहरूख खान पहिली पसंती होती. मात्र त्याच्या खांद्याला दुखापत झाली आणि मला हा शो होस्ट करायला मिळाला. बिग बॉसच्या पाचव्या सीझनमध्ये माझी व संजय दत्तची जोडी विचित्र होती.

भारती सिंग व हर्ष लिंबाचिया ३ डिसेंबर, २०१७ रोजी गोव्यामध्ये विवाहबंधनात अडकले होते. कलर्स वाहिनीवरील खतरों के खिलाडी या रिएलिटी शोच्या नवव्या सीझनमध्ये भारती व हर्ष स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते आणि आता हे दोघे कलर्स वाहिनीवरील बिग बॉस या शोमध्ये सहभागी झाले आहेत. याबाबत बोलताना भारती म्हणाली की, जेव्हापासून माझे लग्न झाले आहे तेव्हापासून आमचा खर्च कलर्सने उचलला आहे. बिग बॉस सीझन १२ मधून हर्ष बाहेर पडला तरी मी शेवटपर्यंत राहणार आहे.

 

बिग बॉस या कायक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन हिट झाले आहेत. या कार्यक्रमाच्या गेल्या सिझनची विजेती शिल्पा शिंदे ठरली होती. यंदाच्या सिझनमध्ये स्पर्धक एकटे नसून जोड्यांमध्ये येणार आहेत. ही जोडी पती-पत्नी, मुलगा-मुलगी कोणाचीही असू शकते. तथापि, बिग बॉस 12 आता जोडीची संकल्पनाच बदलण्यासाठी सज्ज झाला आहे. कारण त्यांची थीमच आहे विचित्र जोड्या. सासू-सून, मामा-भाचा, मालक-नोकर अशा विविध जोड्या या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.  

टॅग्स :बिग बॉस 12सलमान खानभारती सिंग