Join us
Daily Top 2Weekly Top 5

वयाच्या 4६ वर्षांनंतरही एकता कपूर अविवाहित, जितेंद्र आहेत यासाठी जबाबदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 15:20 IST

लग्न करणार नाही असं एकता कपूरनं अनेक कार्यक्रमांमध्ये  सांगितल होतं. तिचा भाऊ अभिनेता तुषार कपूरने देखील लग्न केलेले नाही. सरोगसीद्वारे तो देखील एका मुलाचा पिता बनला.

डेली सोप क्वीन एकता कपूर आज तिचा ४६ वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे. वयाच्या ४६ व्या वर्षीही एकता अविवाहीत आहे. सरोगसीद्वारे एका मुलाची आई बनली आहे. रवि कपूर असे तिच्या मुलाचे नाव आहे. स्वतःच्या आयुष्याविषयी अनेकदा एकता कपूर मनमोकळेपणाणे बोलते. लग्न हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील खास क्षण असला तरी एकता कपूरला मात्र लग्न करायचे नव्हते.

लग्न करणार नाही असं एकता कपूरनं अनेक कार्यक्रमांमध्ये  सांगितल होतं. तिचा भाऊ अभिनेता तुषार कपूरने देखील लग्न केलेले नाही. सरोगसीद्वारे तो देखील एका मुलाचा पिता बनला. तुषार कपूरचा मुलगा लक्ष्यच्या जन्मानंतर, एकतानेही आई होण्याची इच्छा व्यक्त केली होती. जबाबदारी पार पाडण्यास सक्षम होईल तेव्हा आई होण्याचा विचार करेन, असं ती म्हणाली होती. 

शिक्षण पूर्ण केल्यानंतर वयाच्या १९ व्या वर्षीच तिने तिच्या करिअरला सुरुवात केली होती. पापा जितेंद्र यांच्या मदतीने सुरु केलेले करिअरमध्ये तिचा प्रचंड यश मिळाले. इंडस्ट्रीत तिने स्वतःला सिद्ध करुन दाखवले आहे. एकता कपूर इंडस्ट्रीमधली सक्सेसफुल डायरेक्टर, स्क्रिप्ट राइटर आणि प्रोड्यूसर म्हणून ओळखली जाते.

 

आतापर्यत तिने  130 हून अधिक टीव्ही शो प्रोड्यूस केले आहेत. 'हम पांँच', 'क्योंकि साँस भी कभी बहू थी', 'कहानी घर घर की', 'कहीं किसी रोज', 'कसौटी जिंदगी की', 'कहीं तो होगा', 'कसम से', 'पवित्र रिश्ता', 'बड़े अच्छे लगते हैं', 'ये है मोहब्बतें', 'जोधा अकबर', 'नागिन', 'कुमकुम भाग्य' आणि 'कुंडली भाग्य' यासह आणखी काही मालिकांची निर्मिती केली. तर 2001 मध्ये एकताने बॉलिवूड सिनेनिर्मितीत एंट्री केली.'क्योंकि मैं झूठ नहीं बोलता', 'कुछ तो है' आणि 'कृष्णा कॉटेज' सारखे सिनेमेही हिट ठरलेत. 

अनेकदा एकता कपूर तिच्या खासगी आयुष्यामुळेहीच चर्चेत असते. एकताने लग्न न करण्यावर आजही प्रश्नचिन्हं उभे राहतात. वयाच्या २२ व्या वर्षीच एकता कपूरची लग्न करण्याची इच्छा होती. पण १७ व्या वर्षीच पापा जितेंद्र यांनी सांगितले होते की, एकतर लग्न करा किंवा मग नोकरी करा. पॉकेटमनीही देणे बंद केले होते. त्यामुळे एका एड एजन्सीमध्ये तिने काम करायला सुरुवात केली होती. लग्न केले तर एकमेकांसोबत राहण्यासाठी माझ्यात इतका संयम नाही. त्यामुळे लग्न न करताच स्वतःच्या आयुष्यात बिझी झाल्याचे तिने सांगितले होते.

 

टॅग्स :एकता कपूरजितेंद्र